महाडीबीटी च्या माध्यमातून ठिबक व तुषार सिंचनासाठी निवड झालेली असल्यास शेतकऱ्यांनो लगेच ही कागदपत्रे अपलोड करा | Maha DBT Scheme

महाडीबीटीच्या माध्यमातून शेती विषयक विविध प्रकारच्या योजना राबविल्या जातात, या योजनेसाठी अनेक शेतकरी अर्ज करतात परंतु सोडत यादी जेव्हा काढली जाते, त्यावेळेस शेतकऱ्यांचे नाव त्यामध्ये असेल तर त्यांना अगदी थोड्या कालावधीमध्ये कागदपत्रे अपलोड करावी लागतात, परंतु जर शेतकऱ्यांनी कागदपत्रे अपलोड केली नाही, तर मात्र त्यांना योजनेच्या माध्यमातून लाभ दिला जात नाही, परंतु अशा वेळेस अनेक शेतकऱ्यांना नेमकी कागदपत्रे अपलोड कोणती करायची आहे, हेच कळत नाही त्यामुळे योजनेच्या माध्यमातून निवड झाल्यानंतर आवश्यक अपलोड करावी लागणारी कागदपत्रे शेतकऱ्यांना माहिती असावी. 

 

तुम्ही जर एक शेतकरी असाल व तुमच्या शेतामध्ये सिंचनासाठी साधने हवे असतील तर महाडीबीटीच्या पोर्टलवर तुम्ही ठिबक व तुषार सिंचन साठी अर्ज करू शकता, व अर्ज केलेला असेल व सोडत यादी जेव्हा लागेल किंवा लागलेली असेल व त्या यादीमध्ये जर शेतकऱ्यांचे नाव आलेले असेल तर शेतकऱ्यांच्या मोबाईल क्रमांकावर एक मेसेज पाठवला जातो, तेव्हा सात दिवसाच्या कालावधीत कागदपत्रे अपलोड करावी लागतात.

 

आवश्यक कागदपत्रांमध्ये आधार कार्ड, अर्जदाराचे बँक खाते पुस्तक, जर तुमचे सामायिक क्षेत्र असेल तर खातेदाराचे संमतीत पत्र अपलोड करावे. सहा महिन्याच्या आतील सातबारा, आठ अ, जात प्रमाणपत्र, सातबारावर सिंचन स्त्रोत नसेल तर स्वयंघोषणापत्र अशा प्रकारची संपूर्ण आवश्यक कागदपत्रे शेतकऱ्यांना सात दिवसाच्या कालावधीमध्ये अपलोड करावे लागते.

 

अनेवेळा सोडत यादीमध्ये शेतकऱ्यांची निवड होते परंतु कागदपत्रे कोणती अपलोड करावी किंवा केव्हा करावी या बाबी शेतकऱ्यांना माहीत नसल्याने अनेक शेतकरी आतापर्यंत योजनेसाठी अपात्र ठरले आहे, त्यामुळे वरील प्रमाणे देण्यात आलेली कागदपत्रे सोडत यादीमध्ये नाव आल्यानंतर 7 दिवसाच्या कालावधीमध्ये शेतकऱ्यांनी अपलोड करावी.