राज्यातील या बाजार समितीमध्ये कांद्याला मिळाला एवढा दर, उन्हाळी कांदा व लाल कांद्याला मिळालेला दर पहा | Kanda Dar 

दररोजच्या जीवनामध्ये खाद्यान्न बनवण्यासाठी म्हणजेच अन्नपदार्थ बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणात कांद्याचा वापर केला जातो, कांदा ही एक अशी वस्तू आहे ती कितीही स्वस्त असली व कितीही माग असली तरीसुद्धा कोणत्याही परिस्थितीमध्ये नागरिकांना खरेदी करावेच लागनार अशा स्थितीमध्ये बाजार समितीमध्ये कांद्याला काय दर मिळतो आहे, तसेच कोणता कांदा तेजी मध्ये दर येतो आहे, चांगली मागणी कोणत्या कांद्याला मिळालेली आहे अशा प्रकारची संपूर्ण माहिती खालील प्रमाणे जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात त्याचबरोबर लाल कांद्याला व उन्हाळी कांद्याला काय दर मिळतो आहे हे सुद्धा बाजार समित्यानुसार बघूया.

 

राज्यातील विविध बाजार समितीमध्ये जास्त प्रमाणात उन्हाळी कांद्याला मागणी असल्याचे दिसते तसेच लाल कांद्यापेक्षा अर्थातच उन्हाळी कांद्याला चांगला दर मिळत आहे लाल कांद्याला मिळत असलेला दर 1777 ते 2560 रुपये एवढा आहे, 2200 ते 2815 रुपये एवढा दर बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला मिळताना दिसतो. कळवण बाजार समितीमध्ये सर्वात जास्त उन्हाळी कांद्याची आवक झालेली होती.

 

पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला 2750 रूपये एवढा दर मिळालेला आहे, दिंडोरी बाजार समितीमध्ये 2815 रुपये एवढा वेळ उन्हाळी कांद्याला मिळाला. एवढेच नव्हे तर विविध बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला 2600 च्या वरच दर मिळताना दिसतो तसेच, सिन्नर बाजारामध्ये उन्हाळी कांद्याला मिळालेला दर 2650 रुपये एवढा आहे.

 

उन्हाळी कांद्याला चांगला दर मिळत आहे परंतु लाल कांद्याला मात्र उन्हाळी कांद्याच्या तुलनेमध्ये कमी दर मिळत आहे, साक्री बाजारात लाल कांद्याला मिळालेला दर 2560 रुपये एवढा होता, 2550 रुपये सोलापूर बाजारात कांद्याला दर मिळालेला आहे, अशाप्रकारे राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये लाल कांदा व उन्हाळी कांद्याला दर मिळताना दिसतो. परंतु लाल कांद्याच्या दरामध्ये थोडी घसरण झालेली आहे.

 

कापूस व सोयाबीन चे 5 हजार अनुदान कधी मिळणार? सरकार अनुदान देण्यास उशीर का करतेय!