कांदा व सोयाबीनच्या दरात चढ उतार, व कापसाला मिळतोय एवढा दर | Soyabin Dar 

राज्यामध्ये विविध प्रकारच्या पिकांचा समावेश आहे आणि शेतकरी विविध प्रकारची पिके घेतात, अशा शेतकऱ्यांना बाजार भाव जास्त मिळणे गरजेचे आहे कारण मोठ्या प्रमाणात खर्च करून मेहनत करून शेतकरी विविध प्रकारची पिके उत्पादित करतात, परंतु त्यांना शेवटी बाजारात चांगला दर मिळत नसल्याने शेतकरी चींतीत होऊन आपला माल कमी भावाने विकण्यात प्रवृत्त होतात, अशा स्थितीमध्ये शेतकऱ्यांना सर्वच पिकांना चांगला दर देणे अत्यंत गरजेचे आहे. कारण संपूर्ण देश संपूर्ण जग हे केवळ शेतकऱ्याच्या भरोशावरच आज जिवंत आहे कारण खाद्यपदार्थाचा शेतकरी उत्पादित करतो त्याचबरोबर संपूर्ण आपला भारत देश अन्न मिळवू शकत आहे. 

 

कांदा, कापूस, सोयाबीन अशा प्रकारच्या पिकांना कशाप्रकारे दर बाजार समितीमध्ये मिळतो आहे, हे सुद्धा जाणून घेऊया त्याचबरोबरच मागील हंगामाच्या सुरुवातीपासूनच कापसाला अत्यंत कमी दर मिळालेला होता, हमीभावापेक्षा कमी दर मिळालेला असल्याने, शेतकरी चिंतीत झाल्याने कमी भावामध्ये विक्री करावी लागली, सध्याच्या स्थितीमध्ये कापसाला मिळत असलेल्या दर 7100 ते 7700 दरम्यान मिळत आहे. तसेच अशाच प्रकारचा कापसाला दर अजूनही काही दिवस राहू शकतो.

 

बाजाराला समित्यांमध्ये कांद्याची आवक वाढताना दिसते कांद्याची आवक वाढलेली असून कांद्याला मिळत असलेल्या सध्याच्या स्थितीतील दर 2500 ते 3000 रुपये एवढा मिळत आहे, परंतु येणाऱ्या काही दिवसांमध्ये कांद्याची आवक बाजार समितीतील कमी राहणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे, मागील काही दिवसांमध्ये कांद्याला कमी दर झालेला होता, परंतु आता अजूनही कांद्याची वाटचाल चांगल्या दराकडे पोहोचताना दिसते.

 

कापूर दरापेक्षा अत्यंत वाईट परिस्थिती सोयाबीन दराची आहे, सुरुवातीपासूनच सोयाबीनला अत्यंत नीचांकी दर मिळत आहे अशा स्थितीमध्ये अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीनची विक्री केलेली आहे परंतु अजूनही सोयाबीनच्या दरामध्ये सुधारणा झालेली नाही, सध्याच्या स्थितीत सोयाबीनला मिळत असलेला दर 4100 ते 4500 रुपये एवढा दर मिळत आहे, व अशाच प्रकारचा दर पुढील काही दिवसात कायम राहण्याची शक्यता आहे.

 

माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज चुकला असेल, तर लगेच अशा पद्धतीने दुरुस्त करा