शेतकऱ्यांना मिळणार 100 टक्के अनुदानावर बॅटरी फवारणी पंप, या तारखेपर्यंत अर्ज करा | Favarni Pamp 

शेतकऱ्यांना शंभर टक्के अनुदानावर बॅटरी फवारणी पंप मिळणार आहे, यासाठी कृषी विभागाच्या माध्यमातून महाडीबीटी पोर्टल अंतर्गत अर्ज स्वीकारले जात आहे, शेतकऱ्यांना जर शंभर टक्के अनुदानावर बॅटरी फवारणी पंप हवे असतील तर ऑनलाईन पद्धतीने महाडीबीटी पोर्टलवरून कर्ज प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे, खरीप हंगाम चालू झालेला असेल मोठ्या प्रमाणात फवारणी शेतकऱ्यांच्या माध्यमातून विविध पिकांवर केल्या जातात अशा स्थितीमध्ये अनेक शेतकऱ्यांकडे बॅटरी फवारणी पंप उपलब्ध नसतो त्यामुळे बॅटरी फवारणी पंप घेण्यासाठी खर्च करावा लागतो व अशाच शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी असून त्यांना बॅटरी फवारणी पंप 100% अनुदानावर मिळणार आहे. 

 

शंभर टक्के अनुदानावर बॅटरी फवारणी पंप मिळवण्यासाठी महाडीबीटीच्या पोर्टल वर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे, अर्ज प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर योग्य शेतकऱ्यांची त्यामध्ये सोडत यादी काढली जाणार आहे, कृषी विभागाच्या माध्यमातून अर्ज करण्याची तारीख देण्यात आलेली होती, व त्या तारखे मध्ये वाढ करण्यात आलेली आहे, म्हणजे पुढील कालावधी सुद्धा शेतकऱ्यांसाठी वाढवण्यात आलेला आहे, आता शेतकऱ्यांना सहा ऑगस्टपर्यंत बॅटरी फवारणी पंपासाठी अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्याची मुदत देण्यात आलेली आहे.

 

शेतकऱ्यांना अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/Login/Login पोर्टल ओपन करायचे आहे. यूजर आयडी पासवर्ड टाकून लॉग इन करून घ्यावे. त्यानंतर तुम्हाला अर्ज करायचा असल्यामुळे अर्ज करा या बाबीवर क्लिक करून, बॅटरी फवारणी पंप यासाठी अर्ज करायचा असल्याने, कृषी यंत्र अवजारांसाठीच्या खरेदीसाठी अर्थसाह्य या ऑप्शन वर क्लिक करा, बॅटरी संचलित फवारणी पंप या ऑप्शन वर क्लिक करा. त्यानंतर अर्ज सबमिट करा. अशाप्रकारे अर्ज प्रक्रिया पूर्ण होणार आहे.

 

आयुष्यमान भारत योजना अंतर्गत 5 लाखापर्यंतचा मिळणार मोफत उपचार, बघा कोण आहे पात्र