पाईपलाईन अनुदान योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार अनुदान, लगेच या ठिकाणी अर्ज करा | Pipeline Anudan 

शेती करत असताना विविध प्रकारच्या अडचणींना सामोरे जावे लागते अशा स्थितीमध्ये शेती करत असताना शेतीमध्ये भरघोस प्रमाणात उत्पादन काढायचे असेल, तर सर्वात महत्त्वाची बाब म्हणजेच शेतीमध्ये पाण्याची उपलब्धता असणे गरजेचे आहे, परंतु आणि शेतकऱ्यांकडे बोर किंवा विहीर असते परंतु शेतीमध्ये कशाप्रकारे पाण्याचा पुरवठा करावा हे कळत नाही व मोठ्या प्रमाणात पाईपची खरेदी सुद्धा शेतीला पाणी देत असताना करावी लागते त्यामुळे एवढा मोठा प्रमाणात खर्च शेतकऱ्यांना परवडणारा नसतो, यामुळे शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी विविध प्रकारच्या योजना अंमलबजावणी मध्ये आणल्या जात आहे. 

 

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी राबवली गेलेली पाईपलाईन अनुदान योजना या योजनेअंतर्गत गरीब सर्वसामान्य कमी जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे लाभ घेता येणार आहे, या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पाईपलाईन साठी पंधरा हजार रुपयांपर्यंतचे अनुदान दिले जाणार आहे, या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी कोणत्या पात्रता आहेत कोणते शेतकरी योजनेच्या माध्यमातून लाभ घेऊ शकतात तसेच अर्ज प्रक्रिया कशा पद्धतीने व कुठे पूर्ण करायची याबद्दलची संपूर्ण माहिती योजनेसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांकडे उपलब्ध असावी लागते.

 

 

पाईपलाईन अनुदान योजनेअंतर्गत 50 टक्के एवढे अनुदान पाईपलाईन साठी शेतकऱ्यांना दिले जाईल उर्वरित असलेले 50 टक्के एवढी रक्कम शेतकऱ्यांना स्वतः कर्ज करावी लागणार आहे, ही योजना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आहे महाराष्ट्रात रहिवासी असणारे शेतकरी योजनेसाठी अर्ज करू शकतात. अर्ज करत असताना शेतकऱ्यांकडे पाण्याचा स्त्रोत उपलब्ध असावा. एचडीपी पाईप साठी पन्नास रुपये प्रति मीटर याप्रमाणे अनुदान दिले जाणार व हे अनुदान तीनशे मीटर पर्यंतचे असेल.

 

 

पाईपलाईन अनुदान योजनेसाठी इच्छुक असणाऱ्या शेतकऱ्यांना महाडीबीटी पोर्टल वर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे त्यामधून शेतकऱ्यांची निवड केली जाईल त्यामध्ये यादी काढली जाईल त्यानंतर शेतकऱ्यांना योग्य प्रकारे कागदपत्रे काही दिवसांच्या कालावधीमध्ये अपलोड करावी लागतील व त्यानंतर शेतकऱ्यांना पाईपलाईन साठीचे अनुदान दिले जाईल अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणारी पाईपलाईन अनुदान योजना लाभदायक ठरू शकणार आहे.

माझी लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची स्थिती तपासा, अनेक महिलांचे अर्ज मंजूर, तुमचा अर्ज मंजूर झाला का? बघा संपूर्ण प्रोसेस