शेतकऱ्यांना मिळणार कापूस वेचणीसाठी शंभर टक्के अनुदानावर मोफत बॅग, लगेच या ठिकाणी अर्ज करा | Kapus Vechani Bag 

राज्यामध्ये मोठ्या संख्येने कापूस लागवड केली जाते, कापसाची शेती करत असताना विविध प्रकारचे उपकरणे खरेदी करावी लागतात व कापूस ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये असेल अशा शेतकऱ्यांना कापूस वेचणीवर आल्यानंतर कापूस वेचणीसाठी बॅग मोफत मिळणार आहे, कारण महाडीबीटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शंभर टक्के अनुदानावर मोफत कापूस वेचणीची म्हणजेच कापूस साठवण्याची बॅग दिली जाणार आहे त्यामुळे जर तुमच्या शेतीमध्ये कापसाची लागवड केलेली असेल, तुम्हाला जर कापूस साठवणीसाठी बॅग हवी असेल तर ऑनलाईन पद्धतीने महाडीबीटीच्या माध्यमातून अत्यंत सहजरित्या अर्ज प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे. 

 

महाडीबीटी शेतकरी पोर्टलच्या माध्यमातून 2 ऑगस्ट रोजी पासून कापूस वेचणीसाठी असणारी 100% अनुदानावरील बॅग मिळवण्यासाठी अर्ज प्रक्रिया पूर्ण करणे चालू झालेली आहे, कृषी विभागाच्या माध्यमातून या कापूस वेचणीच्या मोफत बॅगचा सर्व शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा अशा प्रकारचे आवाहन शेतकऱ्यांना करण्यात आलेले आहे, ज्यावेळी कापूस वेचणीवर येतो अशावेळी कापूस वेचणी करताना महिला पालवाचा एखाद्या कापडाचा उपयोग करून त्यामध्ये तात्पुरते कापूस साठवतात परंतु आता महाडीबीटी अंतर्गत कापूस वेचताना कापूस साठवण्यासाठी बॅग दिली जाणार आहे.

 

अगदी सहजरीत्या घरबसल्या महाडीबीटी पोर्टलवरून https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/Login/Login अर्ज प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे, त्यासाठी सर्वप्रथम माहिती भरून लॉग इन करून घ्या, बाबी निवडा मध्ये बियाणे औषधे खाते यावर क्लिक करून, साठवणूक सुविधा निवडणे वर क्लिक करून कापूस निवडा, त्यामध्ये कापूस साठवणूक बॅग या ऑप्शन सिलेक्ट करून अर्ज सबमिट करा अत्यंत सहजरीत्या असे अर्ज प्रक्रिया शेतकऱ्यांना करून शंभर टक्के अनुदानावर म्हणजेच मोफत कापूस वेचणीची बॅग मिळवता येणार आहे.

 

पाईपलाईन अनुदान योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार अनुदान, लगेच या ठिकाणी अर्ज करा