आपले सरकार सेवा केंद्र चालू करण्याची अनेकांची इच्छा असते व प्रत्येक जिल्ह्यामध्ये विविध कालावधीत आपले सरकार सेवा केंद्रासाठी अर्ज चालू केले जातात, व अशा प्रकारचे अर्ज सोलापूर जिल्ह्यामध्ये मागविले जात आहे, त्यामुळे तुम्ही जर आपले सरकार सेवा केंद्र चालू करण्यासाठी इच्छुक असाल तर तुम्हाला अर्ज प्रक्रिया पूर्ण करून आपले सरकार सेवा केंद्र चालू करु शकणार आहे.
सोलापूर जिल्ह्यामध्ये आपले सरकार सेवा केंद्रासाठी अर्ज प्रक्रिया स्वीकारणे चालू झालेले असून सोलापूर जिल्ह्यामध्ये एकूण 330 केंद्र उभारली जाणार आहे म्हणजेच 330 लाभार्थ्यांना आपले सरकार सेवा केंद्र चालू करता येणार आहे. 12 ऑगस्ट 2024 ते 30 ऑगस्ट 2024 या कालावधीमध्ये अर्ज स्वीकारले जाणार आहे त्यामुळे अर्ज करू इच्छिणाऱ्या नागरिकांनी 30 ऑगस्टपर्यंत अर्ज करावे.
अर्ज प्रक्रिया ऑफलाइन पद्धतीने करावी लागणार आहे त्यामुळे पीडीएफ देण्यात आलेला असून त्यामध्ये अर्जाची प्रिंट काढून अर्ज सबमिट करावा लागणार आहे, व हा अर्ज सेतू संकलन, महसूल शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय शासकीय दुधडेरी जवळ सात रस्ता परिसर या ठिकाणी अर्ज जमा करायचा आहे.
त्यामध्ये काही अटी व शर्ती देण्यात आलेल्या असून अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवाराचे वय 18 वर्षे पूर्ण असणे गरजेचे आहे तसेच अर्ज करणारा उमेदवार कमीत कमी दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक असून, अर्ज करताना त्यासोबत कोणतीही ओळखपत्र जोडावे, दहा रुपयाच्या स्टॅम्प पेपरसह अर्ज स्वीकारला जाईल, ज्या उमेदवाराचे पूर्वीचे सीएससी सेंटर आहे, अशा उमेदवारांना प्रथम प्राधान्य दिले जाणार आहे.
अर्ज करत असताना योग्य प्रकारे त्यावर सुटसुटीत अक्षरांमध्ये, खोडतोड न करता योग्य माहिती लिहिणे आवश्यक, अर्ज करत असताना योग्य प्रकारे माहिती भरून अर्जदाराला व्यक्तीचा फोटो त्या ठिकाणी लावावा तसेच ई-मेल आयडी मोबाईल क्रमांक उमेदवार व्यक्तीकडे उपलब्ध असावा अशा प्रकारची संपूर्ण माहिती भरल्यानंतर वरील दिलेल्या पत्त्यावर अर्जदाराने 30 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज जमा करावा.