विद्यार्थांना मिळणार फ्री लॅपटॉप सोबत शिष्यवृत्ती, बघा आवश्यक कागदपत्रे व अर्ज प्रक्रिया | Scolarship Yojana 

विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी विद्यार्थ्यांना आता फ्री लॅपटॉप दिला जाणार आहे, त्यासोबतच शिष्यवृत्ती चा सुद्धा लाभ दिला जाईल, त्यामुळे तुम्ही जर पदवी करत असाल पदवीच्या पहिल्या वर्षामध्ये शिकत असाल तर तुम्हाला एअरटेल स्कॉलरशिप योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार आहे, अर्ज करत असताना काही पात्रता विद्यार्थ्याकडे असणे गरजेचे आहे पात्रता निकष मध्ये विद्यार्थी पात्र ठरणे आवश्यक असून काही आवश्यक कागदपत्रे सुद्धा अर्ज करत असताना जोडावी लागणार आहे, काही अटी सुद्धा देण्यात आलेल्या असून त्या अटींमध्ये विद्यार्थी पात्र असावा तसेच अर्ज प्रक्रिया कशा पद्धतीने पूर्ण करायची ही सुद्धा माहिती खालील प्रमाणे जाणुन घेण्याचा प्रयत्न करूयात. 

 

अर्ज करू इच्छिणारा विद्यार्थी भारताचा रहिवासी असणे आवश्यक आहे, भारताचा रहिवासी असावा, विद्यार्थी पदवीच्या पहिल्या वर्षामध्ये शिकत असावा, यापूर्वी एअरटेलच्या इतर कोणत्याही स्कॉलरशिप योजनेचा विद्यार्थ्यांनी लाभ घेतलेला नसावा, आठ लाख 50 हजार रुपये पेक्षा जास्त उत्पन्न विद्यार्थ्यांच्या कुटुंबाची नसावे, या रकमेपेक्षा कमी उत्पन्न असणारे विद्यार्थी अर्ज करू शकतात. या योजनेच्या माध्यमातून मुलींना प्रथम प्राधान्य दिले जाणार आहे, त्यामुळे मुलींसाठी फ्री लॅपटॉप व शिष्यवृत्ती मिळवण्यास सुवर्णसंधी आहे.

 

अर्ज करत असताना अर्ज सोबत काही आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी त्यामध्ये आधार कार्ड, पासपोर्ट साईज फोटो, बँकेचे पासबुक, रहिवासी दाखला, उत्पन्नाचा दाखला, बारावीची मार्कशीट, ऍडमिशन पावती, स्टेटमेंट ऑफ प्रपोज अशा प्रकारची संपूर्ण कागदपत्रे अर्ज करत असताना अपलोड करावी लागणार आहे, 31 ऑगस्ट 2024 पर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार आहे.

 

अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम अधिकृत वेबसाईट ओपन करून घ्यावी  apply now बटन वर क्लिक करा त्यानंतर तुम्हाला विविध प्रकारची माहिती विचारली जाईल त्यामध्ये तुमचे नाव गाव पत्ता बारावी मध्ये पडलेले परसेंटेज कोणत्या अभ्यासक्रमासाठी तुम्ही ऍडमिशन केलेली आहे तसेच अशा प्रकारची इतरही माहिती भरावी लागेल व वरील प्रमाणे दिलेल्या आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागणार आहे व अर्ज सबमिट करावा लागेल अशा प्रकारे अत्यंत सहजरीत्या अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.

 

लाडकी बहिण योजना नंतर आता महिलांसाठी सुरू झाली ही महत्वाची योजना, 10 हजार रुपयांचा लाभ मिळणार