शेतकऱ्यांना मिळणारं पिकं विम्याची रक्कम, 5 लाख 88 हजार शेतकऱ्यांना 853 कोटी रुपये | Pik Vima Rakkam 

शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी कारण मागील वर्षी शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते म्हणजे 21 दिवसापेक्षा जास्त काळ पावसाचा खंड विविध भागांमध्ये पडलेला होता व अशाच प्रकारचा खंड नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा पडलेला होता व त्यामुळे अशा शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याने अशा शेतकऱ्यांना पीक विमा देणे गरजेचे होते, त्यामुळे अशा शेतकऱ्यांना आता पीक विम्याची रक्कम वितरीत केली जाणार आहे.

 

कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी घेतलेल्या निर्णयानुसार आता शेतकऱ्यांना 853 कोटी रुपये वितरित करण्यासाठी चा मार्ग मोकळा झालेला आहे, नाशिक जिल्ह्यातील मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी मागील वर्षी पिक विमा योजनेमध्ये सहभाग नोंदवल्या होता अनेक शेतकऱ्यांना विमा काही प्रमाणात मिळालेला होता परंतु उर्वरित असलेले आता 853 कोटी रुपये एवढी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात 31 ऑगस्ट पर्यंत जमा केली जाणार आहे.

 

5 लाख 88 हजार जवळपास शेतकऱ्यांना लाभ दिला जाणार असून कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्यासह इतरही अधिकाऱ्यांसोबत तसेच पिक विमा कंपनीचे अधिकारी यांच्यासोबतही एक बैठक घेतली जाणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी मागील वर्षी पीक विमा काढलेला होता व नाशिक जिल्ह्यातील शेतकरी ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठी नुकसान झालेले होते असे शेतकऱ्यांच्या खात्यावर 31 ऑगस्ट पर्यंत पैशाची वितरण केले जाणार आहे.

 

शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी वरील प्रमाणे देण्यात आलेली असून शेतकऱ्यांनी दरवर्षी पिक विमा योजनेत नोंदणी फायदेशीर ठरू शकते, तसेच राज्य शासनाच्या माध्यमातून फक्त एक रुपयात पिक विमा योजना राबविण्यात येत असल्याने पीक विमा भरण्यासाठी कोणत्याही प्रकारचे पैसे खर्च करावे लागत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी असून शेतकऱ्यांना 31 ऑगस्ट पूर्वी पीक विमा मिळणार आहे.

 

महामेष योजनेमध्ये शासनाने केले मोठे बदल, डीबीटी च्या माध्यमातून लाभार्थ्यांच्या थेट खात्यात होणार रक्कम जमा