कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार एवढे अनुदान, अर्ज प्रक्रिया सुरू लगेच अर्ज करा | Soyabin Kapus Anudan 

राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात कापूस व सोयाबीन पिकाचे क्षेत्र दरवर्षी जास्त असते व गेल्या वर्षी सुद्धा कापूस व सोयाबीन पिकाचे क्षेत्र जास्त होते परंतु मध्येच पावसाचा खंड पडलेला होता यामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले होते अशा स्थितीमध्ये शेतकऱ्यांना एक प्रकारे अनुदान देणे गरजेचे होते, व यावर्षी शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपये प्रमाणे अनुदान देण्यात मान्यता देण्यात आलेली आहे, त्यामुळे अशा शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी असून, शेतकऱ्यांना सोयाबीन व कापूस पिकासाठी अर्थसाह्य मिळवण्यासाठी अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. 

 

सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दोन हेक्टर च्या मर्यादेमध्ये प्रतिहेक्टरी पाच हजार रुपये एवढे अनुदान शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट वितरित केले जाणार आहे, व अशा प्रकारची घोषणा शासनाने मागील काही दिवसांमध्ये केलेली होती व या संबंधित माहिती आलेली असून आता शेतकऱ्यांनी अर्ज प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे, त्यानंतर शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ दिला जाणार आहे. दोन एकर पेक्षा कमी क्षेत्रासाठी एक हजार रुपये दोन हेक्टर च्या क्षेत्रासाठी प्रति हेक्टरी पाच हजार रुपये म्हणजेच दोन हेक्टरला दहा हजार रुपये मिळतील.

 

4194.68 कोटी रुपये एवढ्या सोयाबीन पिकाच्या अनुदानात निधी वितरित केला जाणार आहे, मागील वर्षी कापूस व सोयाबीन या पिकांची ई पीक पाहणी केली होती म्हणजे पिकांची नोंदणी केलेली होती असेल, अशा शेतकऱ्यांना लाभ दिला जाईल तसेच शेतकरी अनुदानासाठी पात्र ठरणार आहे, परंतु ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केलेली नाही आपल्या पिकांची नोंद केलेली नाही, अशा शेतकऱ्यांना लाभ दिला जाणार नाही.

 

आधार संमती पत्र 

ना हरकत प्रमाणपत्र 

 

शेतकऱ्यांना कृषी सहाय्यकांकडे अर्ज जमा करावयाचा आहे त्यामध्ये आधार वापराबाबत संमती पत्र द्यावे लागेल त्यासोबतच तुम्ही सामायिक असेल तर ना हरकत प्रमाणपत्र सुद्धा भरून घरी सहाय्यकाकडे जमा करावी लागणार आहे, वरील प्रमाणे आधार कार्ड वापराबाबत संबंधी पत्र व ना हरकत प्रमाणपत्र देण्यात आलेले आहे, त्यावरून तुम्ही प्रिंट काढून माहिती भरून कृषी सहाय्यकाकडे जमा करू शकणार आहात.