आयुष्यमान भारत योजना अंतर्गत 5 लाखापर्यंतचा मिळणार मोफत उपचार, बघा कोण आहे पात्र | Aayushyaman Bharat Yojana 

 शासनाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांसाठी गोरगरिबांसाठी विविध प्रकारच्या योजना अवलंबविण्यात येत आहे, विविध योजनांची अंमलबजावणी केली जात आहे, अशाच प्रकारची एक योजना म्हणजेच ज्या योजनेच्या मार्फत गरिबांना सर्वसामान्य नागरिकांना मोफत उपचार दिला जाणार आहे, व हा उपचार सर्व साधारणतः पाच लाख रुपयापर्यंतचा असणार आहे, ही योजना म्हणजेच आयुष्यमान भारत योजना होय, या योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत अनेक नागरिकांनी पाच लाख रुपये पर्यंतचा मोफत उपचार मिळवलेला आहे. सर्वसामान्य गोरगरीब नागरिक मोठ्या बिमाऱ्यांवर जास्त पैसे खर्च करू शकत नाही, पैशाच्या अभावापोटी आजारांना सामोरे जावे लागते अशा स्थितीमध्ये आयुष्यमान भारत योजना अंतर्गत त्यांना योग्य प्रकारे मोफत उपचार उपलब्ध करून दिला जातो.

 

आयुष्यमान भारत योजनेचा लाभ घेण्यासाठी पूर्वी केसरी व पिवळे रेशन कार्ड धारक कुटुंबातील नागरिक पात्र होते परंतु आता पांढऱ्या रेशन कार्ड धारकांना सुद्धा आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत लाभ घेता येणार आहे अर्थातच सर्वसामान्य गोरगरीब नागरिकांना आयुष्यमान भारत योजनेचा मोठ्या प्रमाणात चांगला फायदा होणार आहे कारण योजना सर्वसामान्यांसाठी राबवली जात असून मोठ्या बीमार्‍यांवर यामध्ये विलाज काढून उपचार दिला जातो व यासंबंधी हॉस्पिटल ची सुविधा सुद्धा योग्य प्रकारे प्राप्त आहे.

 

मागील काही दिवसांमध्ये एक मोहीम राबवली गेली होती त्यामध्ये प्रत्येक ठिकाणी मोफत आयुष्यमान कार्ड नागरिकांना उपलब्ध करून दिले जात होते, त्यामध्ये जे नागरिक पात्र आहे अशांच्या आयुष्यमान कार्ड काढण्यात आलेले आहे ,परंतु तुम्हाला जर आयुष्यमान कार्ड काढायचे असेल तर तुम्ही पात्र आहात की नाही हे चेक करून रेशन कार्ड, रहिवासी दाखला व आधार कार्ड या तीन कागदपत्रावरून आयुष्यमान कार्ड काढता येणार आहे.

 

आता 84 दिवस रिचार्ज करण्याचे काम पडणार नाही, लगेच पहा विविध कंपन्यांची परवडणारे रिचार्ज प्लान