मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा जीआर आला, उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना व लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना मिळणार 3 सिलेंडर मोफत | Annpurna Yojana 

राज्य शासनाच्या माध्यमातून महिलांसाठी विविध प्रकारच्या योजना रागावल्या जात आहे, त्यामध्ये सर्वप्रथम महिलांसाठी लाडकी बहीण योजना राबवण्यात आली त्यानंतर महिलांना वर्षाला तीन मोफत सिलेंडर दिले जाणार असल्याची घोषणा सुद्धा शासनाच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना असे त्या योजनेचे नाव असून या योजनेच्या माध्यमातून महिलांना वर्षाला तीन सिलेंडर मोफत दिले जाणार आहे या योजनेच्या माध्यमातून कोणत्या महिला पात्र ठरणार आह, ते जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात तसेच या योजनेमधील लाभ घेण्यासाठी कोणत्या पात्रता आहे हे सुद्धा खालील प्रमाणे जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. 

 

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत उज्वला गॅस योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या महिलांना लाभ दिला जाणार आहे, उज्वला गॅस योजनेच्या जवळपास 52 लाखावरून अधिक महिला पात्र ठरणार आहे तसेच ज्या महिला लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र असतील अशा सुद्धा महिला लाभ घेऊ शकणार आहे, व यासंबंधी शासन निर्णय सुद्धा यादी करण्यात आलेला असून त्यामध्ये काही पात्रता व अटी देण्यात आलेल्या आहे.

 

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत वर्षातून तीन वेळा महिलांना मोफत तीन सिलेंडर दिले जाणार आहे, एका महिन्यामध्ये एकच सिलेंडर दिले जाईल, लाभ घेण्यासाठी महिलेच्या नावावर गॅस सिलेंडर असणे गरजेचे आहे. अशा प्रकारे महिलांना वार्षिक 3 मोफत सिलेंडर दिले जाणार आहे. ही योजना प्रत्येक महिलेपर्यंत पोहोचवण्यासाठी शासनाच्या माध्यमातून एक प्रकारची मोहीम सुद्धा राबवली जाणार असून, त्यामुळे मोफत सिलेंडरचा फायदा अनेक महिलांना होणार आहे.

 

अशा पद्धतीने अगदी घरबसल्या करता येणार रेशन कार्ड सोबत आधार कार्ड लिंक, बघा संपूर्ण प्रोसेस