कापूस व सोयाबीन अनुदानाचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर या तारखेला येणार, कृषी विभागाची माहिती | Anudan Khatyat 

खरीप हंगाम 2023 मध्ये मोठ्या प्रमाणात कापूस व सोयाबीन अशा प्रकारच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, एक प्रकारे कापूस व सोयाबीन या दोन पिकाला अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे, 2023 च्या कालावधीमध्ये मोठ्या कालावधीचा पावसाचा खंड पडलेला असल्याने शेती पिकांनी मोठे नुकसान झालेले होते त्यामध्ये सोयाबीनची पिके जागी उभी वाळून गेलेली होती, तसेच कापसाला सुद्धा पाण्याची आवश्यकता भासत होती अशा स्थितीमध्ये पावसाचा खंड पडल्याने व त्यानंतर आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे बाजारभावावर परिणाम झाला व त्यामुळे कापूस व सोयाबीन या दोन पिकाला अत्यंत निचांकी दर मिळालेला आहे.

 

शेतकऱ्यांना कापूस व सोयाबीन या पिकासाठी प्रति हेक्टरी पाच हजार रुपये अशा प्रकारचे अनुदान देऊ अशी माहिती शासनाच्या माध्यमातून सांगण्यात आलेली आहे, व शासनाच्या माध्यमातून आता संमती पत्र कृषी विभागांमध्ये देण्यात यावे, अशी माहिती दिलेली असून अनेक शेतकरी प्रक्रिया पूर्ण करत आहेत व येत्या काही दिवसातच शेतकऱ्यांना कापूस व सोयाबीनचे अनुदान खात्यावर जमा केले जाणार आहे. संमती पत्र व ना हरकत पत्र योग्य प्रकारे माहिती भरून कृषी विभागांमध्ये शेतकऱ्यांना जमा करावे लागेल.

 

तसेच कापूस व सोयाबीन या पिकासाठी दोन हेक्टर पर्यंतची मर्यादा देण्यात आलेली आहे व काही शेतकऱ्यांचे क्षेत्र जर खूपच कमी असेल तर कमीत कमी एक हजार रुपये एवढी रक्कम शेतकऱ्याला दिली जाईल, ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केलेली आहे अशाच शेतकऱ्यांना हे अनुदान मिळणार आहे, कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार 2 सप्टेंबर ते पाच सप्टेंबर या कालावधीमध्ये थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर सोयाबीन व कापूस पिकासाठीचे अनुदानित केले जाऊ शकते अशा प्रकारची माहिती देण्यात आलेली आहे.

 

नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार प्रोत्साहनपर अनुदान, अनुदान मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना ही प्रक्रिया पूर्ण करावी लागणार