तुमच्या आधार कार्ड सोबत कोणती बँक लिंक आहे? लगेच चेक करा मोबाईल वरून, बँक सिडींग स्टेटस चेक करण्याची संपूर्ण प्रोसेस | Bank Status 

महाराष्ट्र राज्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून माझी लाडकी बहिण योजना राबविण्यात आलेली आहे एक जुलैपासून या योजनेचे अर्ज प्रक्रिया चालू करण्यात आलेली असल्याने, अनेक महिलांनी योजना अंतर्गत अर्ज प्रक्रिया पूर्ण केलेली आहे, 17 तारखेपर्यंत अनेक महिलांच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे जुलै व ऑगस्ट या महिन्याचे मिळून असे एकूण तीन हजार रुपयांची रक्कम जमा झालेली आहे, परंतु अनेक महिला अशा आहे की त्यांनी अर्ज केलेला आहे, त्या योजनेसाठी पात्र आहेत परंतु त्यांच्या कोणत्या बँकेमध्ये पैसे आलेले आहेत किंवा त्यांचा बँक ला आधार कार्ड लिंक आहे किंवा नाही अशी महिलांना माहिती नसल्याने अडचणीला सामोरे जावे लागत आहे.

 

राज्य शासनाने पात्र महिलांच्या खात्यावर तीन हजार रुपयांची रक्कम वितरित केलेली आहे, रक्षाबंधनला भावा कडून राज्यातील अनेक महिलांना छोटेसे गिफ्ट देण्यात आलेले आहेत, त्यामुळे आपल्या कोणत्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक आहे म्हणजे आधार कार्ड कोणत्या बँकेसोबत लिंक आहे हे चेक करण्याची संपूर्ण प्रोसेस महिलांना खालील दिलेल्या प्रोसेसला फॉलो करून पूर्ण करता येणार आहे, व त्यावरून आपली बँक डीबिटी ऍक्टिव्ह आहे की नाही हे सुद्धा महिलांना कळेल.

 

स्टेटस चेक करण्यासाठी सर्वप्रथम uidai.gov.in ओपन करावे, त्यानंतर आधार सर्विसेस या ऑप्शन वर क्लिक करा, आधार लिंकिंग स्टेटस वर क्लिक करून, बँक सीडींग स्टेटस वर क्लिक करून, आपला आधार क्रमांक प्रविष्ट करा व देण्यात आलेला कॅप्चा कोड टाकून लॉग इन हे ऑप्शन निवडा. बँक सेविंग स्टेटस वर क्लिक केल्यानंतर तुमच्या आधार कार्ड ला कोणती बँक लिंक आहे त्या बँकेचे नाव दाखवले जाईल व त्याखाली जर ऍक्टिव्ह असे दाखवत असेल तर तुम्हाला कोणत्याही प्रकारची बदल करण्याची आवश्यकता नाही.

 

बीएसएनएल चा नवीन प्लॅन लॉन्च, 91 रुपयांच्या रिचार्ज मध्ये 90 दिवसाची वैधता प्राप्त होणार