मागील काही दिवसांमध्ये सर्वप्रथम रिलायन्स जिओ, एअरटेल ने आपल्या रिचार्ज च्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ केलेली आहे, दरात मोठ्या प्रमाणात वाढ झालेल्या कारणाने सर्वसामान्य ग्राहकांना महागडे रिचार्ज करणे शक्य होत नाहीये त्यामुळे अनेक जण स्वस्त प्लॅन कुठे उपलब्ध होतात हे बघतात व त्यामुळे स्वस्त प्लॅन सर्वात कमी असलेला BSNLचा आहे त्यामुळे अनेक नागरिक आपले सिम पोर्ट करून BSNL मध्ये कन्व्हर्ट करत आहेत परंतु हे करत असताना काही सावधगिरी बाळगावी आपल्या एरियामध्ये बीएसएनएलचे नेटवर्क आहे की नाही हे सर्वप्रथम चेक करावे.
एअरटेल व जिओ नंतर वोडाफोन आयडिया ने सुद्धा आपल्या रिचार्ज प्लॅन दरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ केलेली आहे त्यामुळे अशा वापरकर्त्यांना आता जास्त पैसे मोजून रिचार्ज करावे लागणार आहे, परंतु हा रिचार्ज सर्व व्यक्तींना पुरे नासा नाही त्यामुळे अनेक जण BSNL मध्ये आपले सिम पोर्ट करत आहेत, कारण बीएसएनएल मध्ये अत्यंत कमी दरामध्ये रिचार्ज प्लॅन उपलब्ध असतात, त्यामुळे त्या ठिकाणी अनेकांनी आपले सिम पूर्ण केलेले आहे, परंतू हे सर्व करण्यापूर्वी आपण ज्या भागांमध्ये राहतो त्या भागात BSNL चे पूर्ण नेटवर्क आहे की नाही हे चेक करावे.
BSNL ते नेटवर्क आहे की नाही हे चेक करण्याची एक सोपी पद्धत आहे त्यामध्ये, https://tarangsanchar.gov.in/emfportal ही वेबसाईट ओपन करा वेबसाईट ओपन केल्यानंतर त्यामध्ये सर्वप्रथम माय लोकेशन हे ऑप्शन निवडा, त्यानंतर विचारली गेलेली संपूर्ण माहिती योग्य प्रकारे भरा त्यामध्ये तुमचे नाव, ईमेल आयडी टाकावा लागेल, त्यानंतर एक ओटीपी येऊन तो इंटर करावा, त्यानंतर एक नकाशा तुमच्यापुढे ओपन होईल त्यामध्ये बीएसएनएलचे टावर कुठे आहे हे दिसेल, व टू जी, फोर जी अशा प्रकारची संपूर्ण माहिती सुद्धा त्या ठिकाणी मिळेल अशाप्रकारे तुमच्या आजूबाजूला बीएसएनएल नेटवर्क आहे की नाही हे समजेल.
पी एम सूर्यघर मुफ्त बिजली योजना, 300 युनिट मोफत वीज कशी मिळणार? जाणून घ्या