कापूस व सोयाबीन चे 5 हजार अनुदान कधी मिळणार? सरकार अनुदान देण्यास उशीर का करतेय! | Cotton Soyabean Anudan

दरवर्षी मोठ्या प्रमाणात शेती पिकांचे नुकसान होते, परंतु शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्याला आता सोयाबीन व कापसासाठी हेक्टरी पाच हजार रुपये येणार अशा प्रकारची घोषणा करण्यात आलेली असल्याने, त्या गोष्टीची अंमलबजावणी कधी केली जाणार आहे, याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागलेले आहे, कारण विधानसभा निवडणुका पुढे आल्याने विविध प्रकारचे निर्णय शासनाच्या माध्यमातून विविध घटकांसाठी घेतले जात आहे, अशाच प्रकारचा निर्णय सभेमध्ये शासनाच्या माध्यमातून घेण्यात आलेला होता, व सोयाबीन व कापसाला हेक्टरी पाच हजार रुपये एवढी मदत देण्याची माहिती देण्यात आलेली होती. 

 

त्यानंतर राज्यातील महिलांना खुश करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून महिलांसाठी मोठ्या प्रमाणात योजना राबवल्या गेलेल्या आहे, त्यामध्ये महिलांसाठी माझी लाडकी बहीण योजना राबवण्यात आलेली असून, यासंबंधीची अर्ज प्रक्रिया चालू करण्यात आलेली आहे, याप्रमाणे माझा लाडका भाऊ योजना सुद्धा चालू करण्यात आलेली असून त्यासंबंधी सुद्धा अर्थ प्रक्रिया चालू झालेली आहे, परंतु हे सर्व होत असताना शासनाने दिलेल्या माहितीनुसार केलेल्या घोषणेनुसार कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेस्टरी 5000 रुपये देण्याचे नावच निघेनासे झालेले आहे.

 

कापूसला सोयाबीनला हेक्टरी पाच हजार रुपये दोन हेक्टर च्या मर्यादेमध्ये देण्यात येणार अशा प्रकारची घोषणा झालेली होती, त्याचबरोबर या योजनेसाठी शेतकऱ्याला लाभ घेण्यास अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी लागणार असल्याची माहिती सुद्धा देण्यात आलेली होती, परंतु मागील काही दिवसांपासून या मदत वाटपा संबंधित कोणत्याही प्रकारची वाटचाल किंवा कोणत्याही प्रकारची माहिती अजून पर्यंत पुढे आलेली नाही त्यामुळे सरकार या कापूस उत्पादक व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या मदतीला धावणार की नाही म्हणजेच पैसे मदत देणार की नाही हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांना पडलेला आहे.

 

सिबिल स्कोर म्हणजे काय? शेतकऱ्यांचा कर्ज घेताना सिबिल स्कोर विचारात घेतल्यास लगेच एफ आय आर दाखल होणार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस