पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चालू केली किसान ड्रोन योजना, शेतकऱ्यांनो लगेच ड्रोन अनुदानासाठी अर्ज करा | Dron Yojana 

शेतकऱ्यांसाठी विविध प्रकारच्या योजना देशांमध्ये राबवल्या जात आहे व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या अत्यंत हिताची एक योजना चालू करण्यात आलेली आहे, त्या योजनेचे नाव किसान ड्रोन योजना असे असून या योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना ड्रोन खरेदीसाठी अनुदान दिले जाणार आहे, या किसान ड्रोन योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे अनुदान दिले जाईल व ड्रोन खरेदी करण्यास शेतकऱ्यांना आर्थिक मदत होणार आहे ड्रोन खरेदी केल्याने शेतकऱ्यांचा शेतीवर होणारा खर्च सुद्धा वाचणार आहे, कारण शेतीवर मोठ्या प्रमाणात काम करण्यासाठी मजुरांची आवश्यकता असते फवारणी करण्यासाठी मजूर लागतात परंतु मजुरांची उपलब्धता होत नाही, अशा स्थितीमध्ये ड्रोनच्या माध्यमातून अगदी काही मिनिटांमध्ये एका एकरातील फवारणी केली जाऊ शकते म्हणजेच मोठ्या प्रमाणात फवारणी शेतकरी आपल्या डोळ्यांच्या माध्यमातून सहज करू शकतो. 

 

दोनच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या पाण्याची बचत होणार आहे, वेळेची सुद्धा बचत होणार आहे किंवा होणारा खर्च सुद्धा एक प्रकारे कमी होऊ शकतो, कृषी विज्ञान केंद्र व महाविद्यालयांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ड्रोन उडवण्यासाठी म्हणजे ड्रोन चा वापर करण्यासाठीचे मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे, कारण शेतकऱ्याला ड्रोन खरेदी केल्यानंतर ते चालवता येणे गरजेचे आहे. ड्रोन चा वापर राज्यस्थान व महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी चालू केलेला आहे ड्रोनचे महत्त्व शेतकऱ्यांना कळलेले असून मोठ्या संख्येने शेतीमध्ये अत्यंत सहजरीत्या ड्रोन चा वापर करून शेतकरी फवारण्या करू शकत आहेत.

 

अशाप्रकारे अनेक शेतकरी किसान ड्रोन योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी उत्सुक असतील त्यामुळे अशा शेतकऱ्यांना अर्ज प्रक्रिया पूर्ण करून किसान ड्रोन योजनेचा लाभ घेता येणार आहे, कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन शेतकऱ्यांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज प्रक्रिया ड्रोनसाठीची करता येणार आहे, अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठीची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राबवलेली किसान ड्रोन योजना शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे व त्यासह शेतकऱ्यांना ड्रोन वापरण्याचे सोबतच प्रशिक्षण सुद्धा दिले जाईल.

 

शेतकऱ्यांना मिळणार 100 टक्के अनुदानावर बॅटरी फवारणी पंप, या तारखेपर्यंत अर्ज करा