शेतकऱ्यांनो लगेच आपल्या सातबाऱ्यावर पिकांची माहिती नोंदवा, बघा संपूर्ण प्रोसेस | E Pik Pahani 

शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी, शेती करत असताना मोठ्या अडचणींना सामोरे शेतकऱ्यांना जावे लागते नैसर्गिक संकट, दुष्काळ परिस्थिती अतिवृष्टी अशा विविध प्रकारच्या संकटांना सामोरे जाऊन शेतकऱ्याला शेती करावी लागते ,अशा स्थितीमध्ये शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते व त्यामुळे शेतकरी दरवर्षी पिक विमा योजनेअंतर्गत नोंदणी करतात तसेच शेतकऱ्यांना नुकसान झाले असता शासनाच्या माध्यमातून मदत किंवा अनुदान सुद्धा दिली जाते, अशा स्थितीमध्ये अनुदान देत असताना ज्या शेतकऱ्यांनी आपला सातबारावर पिकांची नोंदणी केलेली आहे अशा शेतकऱ्यांना मदत दिली जाते व आता शेतकऱ्यांना पटवाऱ्याकडे न जाता ऑनलाइन पद्धतीने शेतात जाऊन सुद्धा आपल्या पिकांची ई पीक पाहणी करता येणार आहे. 

 

खरीप हंगाम 2024 मधील ई पीक पाहणी एक ऑगस्ट ते पंधरा सप्टेंबर या तारखे दरम्यान शेतकऱ्यांना करता येणार आहे, त्यामुळे ई पीक पाहणी कशा प्रकारे करायची याची संपूर्ण माहिती खालील प्रमाणे जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात, सर्वप्रथम प्ले स्टोअर वर जाऊन ईपीक पाहणी डीसीएस हे ॲप इंस्टॉल करा, तुमचा महसूल विभाग निवडा, लॉगिन पर्याय निवडून, मोबाईल क्रमांक टाका त्यानंतर खातेदाराचे नाव टाका, त्यानंतर संकेतांक एंटर करा. त्यानंतर एकूण सहा ऑप्शन दाखवले जातील त्यामधील पिकांची माहिती नोंदवा यांना सिलेक्ट करा.

 

शेतकऱ्यांचा खाते क्रमांक गट क्रमांक टाका, बहुपीक किंवा एक पीक असेल त्यापैकी ऑप्शन निवडा, त्यामध्ये तुमच्या शेतीतील किती क्षेत्र कोणत्या पिकांसाठी आहे ते निवडा, संपूर्ण माहिती योग्य प्रकारे भरल्यानंतर आणि लागवडीची तारीख निवडा, त्यानंतर फोटो काढा ऑप्शन वर क्लिक करून आपल्या पिकाचा फोटो काढून अपलोड करा, अशा पद्धतीने तुमची ई पीक पाहणी पूर्ण होईल, व तुमच्या सातबारावर तुम्ही पेरलेल्या पिकांची नोंदणी सहजरित्या होणार आहे.

 

लाडकी बहीण योजनेचे मराठीतील अर्ज मंजूर होणार, त्यासह महिलांच्या खात्यात एक रुपया पाठवला जाईल