शेतकऱ्यांनो या तारखेपासून ई पीक पाहणी होणार सुरू, या ॲप द्वारे करता येणार ई पीक पाहणी | E Pik Pahni 

शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी विविध प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहे, व मागील काही दिवसांपासून शेतकऱ्यांना घरबसल्या ई पीक पाहणी करण्याची सुविधा शासनाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली आहे, दरवर्षी शेतकरी कोणत्या पिकांची पेरणी कोणकोणत्या क्षेत्रामध्ये करतो अशा प्रकारची संपूर्ण माहिती आपल्या सातबारावर शेतकऱ्यांना ई पीक पाहणी करून नोंदवता येणार आहे, अशा प्रकारची अत्यंत सुलभ प्रक्रिया शेतकऱ्यांना पूर्ण करून आपल्या सातबारावर पिकांची नोंदणी करता येईल.

 

दरवर्षी किती पिकांचे काही ना काही कारणामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होते त्यामध्ये अतिवृष्टी झाली असल्यास होणारे नुकसान, कधी दुष्काळामुळे होणारे नुकसान अशा प्रकारच्या विविध नुकसानीच्या वेळी शेतकऱ्यांना एक प्रकारची आर्थिक मदत करत असताना शेतकऱ्यांनी नेमकी कोणती पिके घेतलेली होती अशा प्रकारची माहिती शासनाला उपलब्ध होऊन एक प्रकारची मदत शेतकऱ्यांना देण्यास सुलभता निर्माण होते.

 

अनेक शेतकरी पिक विमा काढतात पिक विमा काढल्यानंतरही पीक पाहणी करणे अत्यंत महत्त्वाची बाब आहे, शासनाच्या माध्यमातूनही पीक पाहणी करण्याची तारीख ठरवली जाते, यावर्षी खरीप हंगाम 2024 ई पीक पाहणी करण्याची तारीख 1 ऑगस्ट 2024 पासून 15 सप्टेंबर 2024 पर्यंत देण्यात आलेली आहे. शासनाच्या माध्यमातून ई पिक पाहणी करण्याचे नवीन ॲप्लिकेशन उपलब्ध करून देण्यात येणार आहे, प्ले स्टोअर वर हे ॲप्लिकेशन 1 ऑगस्ट 2024 पासून उपलब्ध होणार आहे. अशाप्रकारे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी असून शेतकऱ्यांनी एक ऑगस्ट पासून ई पीक पाहणी करण्यास सुरुवात करावी.

 

शिंदे सरकारचा निर्णय, लाडक्या बहिणींना मिळणार मोफत तीन सिलेंडर