चार्जिंग वरील फवारणी पंप मिळणार 100 टक्के, अनुदानावर लगेच या ठिकाणी अर्ज पूर्ण करा | Favarani Pamp 

शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी सध्याच्या स्थितीमध्ये खरीप हंगाम चालू झालेला असल्याने मोठ्या प्रमाणात शेती मधे नॅनो डीएपी, नॅनो युरियाचा वापर केला जातो, त्यासोबतच त्यांचा वापर करण्यासाठी फवारणीच्या पंपाची आवश्यकता शेतकऱ्यांना लागते अशा स्थितीमध्ये पूर्ण किंमत देऊन फवारणी पंप खरेदी करणे सर्वसामान्य शेतकऱ्यांना सहज शक्य होत नाही, त्यामुळे महाडीबीटी शेतकरी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी शंभर टक्के अनुदानावर चार्जिंग पंप दिले जाणार असून नॅनो डीएपी, नॅनो युरिया यासाठी सुद्धा अर्ज चालू झालेले आहे, ज्या शेतकऱ्यांना असे पंप हवे असेल अशांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रिया पूर्ण करायची आहे. 

 

महाडीबिटी पोर्टलवरून अर्ज स्वीकारणे चालू आहे यापूर्वी याची अंतिम मुदत 30 जून देण्यात आलेली असली, तरी सुद्धा अर्ज स्वीकारले जात आहे, ज्या शेतकऱ्यांना अशा 100% अनुदानावर असलेल्या चार्जिंग पंपाचा नॅनो डीएपी त्यासह नॅनो युरिया यावर शंभर टक्के अनुदानाचा लाभ घ्यायचा असेल तर लगेच महाडीबीटी शेतकरी योजनेच्या पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज लवकरात लवकर करावा.

 

शेतकऱ्यांनी अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम महाडीबीटी पोर्टल ओपन करावे त्या ठिकाणी सर्वप्रथम लॉगिन करायचे आहे, काही विचारली गेलेली माहिती भरून लोगिन करून घ्यावी, त्यानंतर कृषीयांत्री कीकरण ही बाब निवडून पुढे कृषी यंत्र निवडून बॅटरी संच कापूस निवडा, त्यानंतर अर्ज सादर करायचा आहे. नॅनो डीएपी व नॅनो युरिया साठी अर्ज करायचा असल्यास बियाणे औषधे व खते हे निवडून नैनो डीएपी निवडा व अर्ज सबमिट करा. अशाप्रकारे अत्यंत साहजरीत्या अर्ज करता येईल.

 

शेतकऱ्यांनो या तारखेपासून ई पीक पाहणी होणार सुरू, या ॲप द्वारे करता येणार ई पीक पाहणी