शेतकऱ्यांनो 100 टक्के अनुदानावर बॅटरी अपोरेटेड फवारणी पंप मिळवण्यासाठी लगेच अर्ज करा, अर्ज प्रक्रिया संपूर्ण प्रोसेस | Favarani Pamp 

राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांना आता शंभर टक्के अनुदानावर बॅटरी अपोरेटेड फवारणी पंप मिळवता येणार आहे, यासाठी ऑनलाईन पद्धतीने महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अर्ज प्रक्रिया पूर्ण करायची आहे, ही अर्ज प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर योग्य त्या शेतकऱ्यांची निवड करून शंभर टक्के अनुदानावर शेतकऱ्यांना बॅटरी अपोरेटेड फवारणी पंपाचे वितरण केले जाईल, अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे, त्यामुळे महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून अर्ज प्रक्रिया कशा पद्धतीने करायची हे सुद्धा खालील प्रमाणे जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. 

 

शेती मध्ये विविध प्रकारच्या फवारणी कराव्या लागतात त्या स्थितीमध्ये बॅटरीवर चालणारा फवारणी पंप शेतकऱ्यांकडे उपलब्ध असणे अत्यंत आवश्यक आहे, व महाडीबीटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शंभर टक्के अनुदानावर बॅटरी अपोरेटेड फवारणी पंप 100% अनुदानावर दिला जाणार असल्याने शेतकऱ्यांनी लवकरात लवकर अर्ज प्रक्रिया करणे आवश्यक आहे, पूर्वी या फवारणी पंपासाठी अर्ज करण्याची तारीख सहा ऑगस्ट देण्यात आलेली होती, परंतु या तारखे मध्ये वाढ करण्यात आलेली असून आता 14 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे.

 

अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम शेतकऱ्यांना महाडीबीटी पोर्टल ला ओपन करायचे आहे, त्यानंतर शेतकऱ्यांना लॉगिन करायचे आहे विचारले गेलेली माहिती मोबाईल क्रमांक, आधार कार्ड क्रमांक वगैरे टाकून ओटीपी टाकून लॉगीन करून घ्यावे, त्यामुळे शेतकऱ्यांना अर्ज करायचा असल्याने अर्ज करा ही बाब निवडा, कृषी यांत्रिकीकरणावर क्लिक करून, मनुष्य चलीत अवजारे घटक निवडा, बॅटरी अपोरेटेड फवारणी पंप सिलेक्ट करून, जतन करा हे ऑप्शन निवडा. अशाप्रकारे अत्यंत सहजरीत्या महाडीबीटी फॉर्मवर जाऊन शेतकऱ्यांना बॅटरी अपोरेटेड फवारणी पंपासाठी अर्ज प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चालू केली किसान ड्रोन योजना, शेतकऱ्यांनो लगेच ड्रोन अनुदानासाठी अर्ज करा