आता गोदमासाठी मिळणार अनुदान, जाणून घ्या काय आहे योजना? | Godam Yojana

शेतकऱ्यांच्या माध्यमातून शेतीतून मोठ्या प्रमाणात उत्पादन काढल्या जाते परंतु उत्पादन काढल्याबरोबर ते बाजारामध्ये विकायची झाल्यास कमी दरामध्ये किंवा जो दर मिळेल त्या दरामध्ये विकून शेतकऱ्यांचे नुकसान होते अशा स्थितीमध्ये जर गोदाम बांधून शेतकऱ्यांनी मालाची साठवणूक करून ठेवली व ज्यावेळी चांगला दर मिळत आहे अशा वेळेस शेतीमालाची विक्री केली तर त्यांच्या उत्पन्नामध्ये मोठी वाढ होऊ शकते व यासाठी शेतकऱ्यांना एक प्रकारची मदत व्हावी त्यांना गोदाम बांधण्यासाठी अर्थसहाय्य प्राप्त व्हावे याकरिता विविध प्रकारच्या योजना राबविल्या जातात, राष्ट्रीय अन्न व पोषण अभियाना कडधान्य व राष्ट्रीय खाद्यतेल अभियाना अंतर्गत गोदाम बांधण्यासाठी पन्नास टक्के एवढे अनुदान दिले जाणार आहे. 

 

2024 25 च्या आर्थिक वर्षांमध्ये 250 मेट्रिक टन चे गोदाम बांधण्यासाठी शेतकऱ्यांना अर्थसहाय्य दिले जाणार आहे, शेतकऱ्यांना जास्तीत जास्त 12 लाख 50 हजार एवढे गोदामा बांधकामासाठी प्रत्यक्ष खर्चाच्या 50% एवढे अनुदान म्हणजेच आर्थिक लाभ दिला जाईल, शेतकऱ्यांना एक प्रकारच्या आर्थिक सहाय्य प्राप्त होऊन अनुदानामुळे शेतकरी गोदाम व बांधतील व त्यांच्या मालाची साठवणूक केली जाईल अशा स्थितीमध्ये दुहेरी फायदा शेतकऱ्यांचा होणार आहे कारण शेतीमालाची साठवणूक केल्याने शेतकऱ्यांना योग्य भाव आल्यावर मालाची विक्री केल्यास जास्तीत जास्त नफा मिळणार आहे.

 

ज्या शेतकऱ्यांना गोदामा बांधण्यासाठी अनुदान हवे असेल अशा शेतकऱ्यांनी 31 जुलै पर्यंत अर्ज प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे अर्ज प्रक्रिया पूर्ण करत असताना शेतकऱ्यांनी काही आवश्यक कागदपत्रे जोडावी लागतील, त्यामध्ये आधार कार्ड सातबारा तसेच अर्जदाराच्या बँक खात्याचा तपशील जोडावा, अर्ज प्रक्रिया तालुका कृषी अधिकारी किंवा मंडळ कृषी अधिकारी कार्यालयामध्ये करता येणार आहे. अशाप्रकारे एक प्रकारचे अनुदान शेतकरी गोदाम बांधण्यासाठी मिळवू शकतात.

 

महाडीबीटी च्या माध्यमातून ठिबक व तुषार सिंचनासाठी निवड झालेली असल्यास शेतकऱ्यांनो लगेच ही कागदपत्रे अपलोड करा