राज्यात मुसळधार पावसाची शक्यता, या भागात वर्तवला ऑरेंज अलर्ट बघा राज्यातील संपूर्ण हवामान अंदाज | Havaman Andaj 

सध्याच्या स्थितीमध्ये राज्यातील विविध भागांमध्ये जोरदार स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावलेली आहे, गेल्या दोन-तीन दिवसांपासून विविध भागांमध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस पडताना दिसतो, तसेच हवामान शास्त्र विभागाने काही भागात अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली असून काही भागांमध्ये अलर्ट सुद्धा जरी केलेली आहे, त्यामुळे कोणत्या भागात नेमका मोठा पाऊस पडणार आहे तसेच कोणत्या भागात अलर्ट वर्तवलेला आहे,हे सुद्धा जाणून घेण्याचा प्रयत्न करूया तसेच राज्यातील विविध भागांमध्ये धरणातील पाण्याच्या साठ्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ सुद्धा या पाण्यामुळे होताना दिसते. 

 

हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार पुण्यासह घाटमाथ्यावर पावसाची शक्यता वर्तवलेली आहे, कोल्हापूरमध्ये सुद्धा ऑरेंज अलर्ट वर्तवण्यात आलेला आहे त्यामुळे या भागात मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडू शकतो, व मुंबई शहर व उपनगरामध्ये सुद्धा जोरदार ते अति जोरदार पावसाच्या सरींवर बरसणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आलेली असून, या भागांमध्ये वाऱ्याचा वेग सुद्धा जास्त असणार आहे.

 

पंचगंगा नदीची पातळी सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली आहे, तसेच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पूर परिस्थिती गंभीर बनताना दिसत आहे, त्यामुळे कोल्हापूरमध्ये सावधगिरीचा इशारा सुद्धा वर्तवण्यात आलेला असल्याने, या भागात अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवलेली आहे, तसेच चंद्रभागा नदी सुद्धा दुधडी भरून वाहू लागलेली आहे. अशाप्रकारे जोरदार स्वरूपाचा पावसाचा इशारा राज्यातील विविध भागांमध्ये आहे.

 

हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केलेल्या आहे त्यामध्ये गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, सातारा, पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड या भागांचा समावेश असून ऑरेंज व येलो वर्तवलेल्या भागांमध्ये नागपूर, मुंबई, ठाणे या जिल्ह्यांचा समावेश आहे अशा प्रकारे वरील प्रमाणे ऑरेंज व येलो अलर्ट विविध जिल्ह्यांमध्ये वर्तवले गेलेले आहे.

 

पी एम सूर्यघर मुफ्त बिजली योजना, 300 युनिट मोफत वीज कशी मिळणार? जाणून घ्या