कापूस साठवणुकीसाठी मिळणार शेतकऱ्यांना बॅग, लगेच अशा पद्धतीने अर्ज करा | Kapus Sathavnuk Bag

राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात कापसाचे उत्पादन घेतले जाते व अशाच कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी म्हणजे आता कापूस उत्पादक शेतकऱ्यांना कापसाची पेरणी करताना साठवणुकीसाठी बॅग दिल्या जाणार आहे, एक हेक्टर साठी जवळपास आठ बॅग शेतकऱ्याला दिल्या जातील त्यामुळे मिळवण्यासाठी काय करावे तसेच या बॅग कुठे मिळतील व त्यासाठी अर्ज प्रक्रिया कशा पद्धतीने शेतकऱ्याला पूर्ण करावी लागणार आहे, अशा प्रकारची संपूर्ण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न खालील प्रमाणे करूयात. 

 

डीबीटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कापूस साठवणीसाठी बॅग करिता अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे, डीबीटी च्या माध्यमातून शेतकऱ्याला 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे, त्यानंतर मात्र कापूस साठवणुकीच्या बॅगी करिता अर्ज प्रक्रिया पूर्ण करता येणार नाही, त्यामुळे शेतकऱ्यांनी लवकरात लवकर जर कापूस साठवणूक बॅग हवी असेल तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे आहे.

 

अर्ज कशा पद्धतीने करावा हा प्रश्न शेतकऱ्यांना अर्थात पडलेला असेल तर त्यामध्ये सर्वप्रथम अर्ज करण्यासाठी डीबीटीचे पोर्टल ओपन करावे, माहिती भरून लॉगीन व्हा, बियाणे औषधे खते या ऑप्शनला निवडा, ती कापूस निवडून, कापूस साठवणूक बॅग ऑप्शन सिलेक्ट करा, अशा पद्धतीने विचारली गेलेली संपूर्ण माहिती मोबाईल क्रमांक वगैरे भरून अर्ज शेवटी सबमिट करा त्यानंतर तुम्हाला पुढील काही दिवसात पुन्हा एकदा पोर्टल वर जाऊन माहिती चेक करावी त्यामध्ये यादी सुद्धा काढली जाईल, व बॅग दिली जाईल.

 

लाडकी बहिण योजना नंतर आता महिलांसाठी सुरू झाली ही महत्वाची योजना, 10 हजार रुपयांचा लाभ मिळणार