सन 2023 मध्ये शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात अवेळी पडलेल्या पावसामुळे व दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले होते, अशा स्थितीमध्ये कापूस व सोयाबीन या पिकांना चांगला दर मिळालेला नव्हता, त्यामुळे शेतकरी कचाट्यात पडलेले आहे व त्यांना आर्थिक मदत मिळणे, अपेक्षित होते, त्यामुळे शासनाच्या माध्यमातून अर्थसंकल्पामध्ये कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 5000 रुपये एवढे अर्थसहाय्य देऊ अशा प्रकारचा निर्णय घेण्यात आलेला होता, म्हणून मागील काही दिवसांपासून त्यावर कोणत्याही प्रकारची माहिती पुढे आलेली नव्हती परंतु कृषी विभागाच्या झालेल्या बैठकी नुसार आता शेतकऱ्यांना कापूस व सोयाबीन उत्पादकांना प्रतिहेक्टर 5000 रुपये देण्याचा निर्णय घेतलेला आहे.
ज्या शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची नोंदणी म्हणजेच ई पीक पाहणी केलेली होती अशा शेतकऱ्यांना अर्थसाह्य देण्याचा निर्णय घेतलेला आहे, त्यामध्ये शेतकऱ्याला प्रति हेक्टर 5000 रुपये प्रमाणे दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये कापूस व सोयाबीन साठी अर्थसहाय्य दिले जाणार आहे. तसेच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट डीबीटीच्या माध्यमातून रक्कम जमा केली जाईल, शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याच्या शासन निर्णयानुसार पैसे वितरित करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे.
कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 5000 रुपये प्रमाणे दोन लिटरच्या मर्यादेमध्ये अनुदान देण्यासाठी निधीच्या खर्चास मान्यता देण्यात आलेली आहे, त्यामध्ये सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्यासाठी 2646 कोटी 34 लाख रुपये व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना 1548 कोटी 34 लाख रुपये एवढा निधी वितरित केला जाणार आहे, अशा प्रकारे शासनाच्या माध्यमातून लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रति हेक्टर पाच हजार रुपये प्रमाणे कापूस व सोयाबीनचे अनुदान वितरण केले जाईल.
चार्जिंग वरील फवारणी पंप मिळणार 100 टक्के, अनुदानावर लगेच या ठिकाणी अर्ज पूर्ण करा