महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवली जात आहे, या योजनेची घोषणा 28 जून 2024 रोजी करण्यात आलेली असून एक जुलैपासून या संबंधित अर्ज प्रक्रिया चालू झालेली आहे, राज्यातील महिलांना दर महिन्याला 1500 रुपये खात्यावर माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून दिले जाणार आहे, या योजनेअंतर्गत आतापर्यंत अनेक महिलांनी अर्ज केलेला आहे कोणत्या महिलांनी ऑफलाइन पद्धतीने तर काही महिलांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रिया माझी लाडकी बहीण योजनेची पूर्ण केलेली आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंबंधीत पूर्वी मोठ्या प्रमाणात अटी देण्यात आलेल्या होत्या, परंतु विरोधकांच्या मार्फत आवाज उठवण्यात आल्यानंतर अनेक प्रकारच्या अटी देण्यात करण्यात आलेल्या आहे, त्यामध्ये वयाची अट म्हणजेच वयाची मर्यादा साठ वर्षांवरून 65 वर्षे एवढी करण्यात आलेली असून शेतीची अट सुद्धा काढून टाकण्यात आलेली आहे, यासह इतरही अटी काढून टाकण्यात आलेल्या असून यामुळे मोठ्या संख्येने महिला योजनेसाठी पात्र ठरत आहेत.
महिलांनी अर्ज प्रक्रिया पूर्ण केलेली असल्याने त्या महिलांचे अर्ज अप्रुव्हल झालेले आहे की नाही म्हणजेच अर्जाला मंजुरी मिळालेली आहे की नाही हे अत्यंत सहजरीत्या महिलांना चेक करता येणार आहे, कारण अनेक महिलांचे अर्ज मंजूर झालेले आहे, व त्यांना अशा प्रकारचा मेसेज सुद्धा आलेला असेल तुमचा अर्ज मंजूर झालेला आहे की नाही हे चेक करण्याची अत्यंत साधी सोपी पद्धत खालील प्रमाणे देण्यात आलेली आहे.
सर्वप्रथम नारीशक्ती हे आपलिकेशन अपडेट करा, त्यानंतर अर्ज करताना जो मोबाईल क्रमांक टाकलेला होता तो मोबाईल क्रमांक बॉक्समध्ये एंटर करा. त्यानंतर तुमच्या मोबाईलवर आलेला ओटीपी ओटीपी बॉक्समध्ये एंटर करा, व्हेरिफाय ओटीपी वर क्लिक करून त्यानंतर तुम्ही केलेले अर्ज दाखविले जाईल, त्यामधील जो अर्ज चेक करायचा असेल त्यावर क्लिक करा. त्यानंतर तुमच्या अर्जासमोर Approved दाखवत असेल तर तुमचा अर्ज मंजुर झालेला आहे.
Rejected असे ऑप्शन दाखवत असेल तर तुमचा अर्ज मंजूर झालेला नाही अशाप्रकारे महिलांना आपला अर्ज मंजूर झालेला आहे की नाही हे चेक करता येणार आहे.
अशा पद्धतीने अगदी घरबसल्या करता येणार रेशन कार्ड सोबत आधार कार्ड लिंक, बघा संपूर्ण प्रोसेस