राज्य शासनाच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये माझी लाडकी बहीण योजना महिलांसाठी चालू करण्यात आलेली आहे, ही योजना मध्य प्रदेश सरकारच्या धरतीवर राबविण्यात आलेली आहे, म्हणजेच मध्य प्रदेश मध्ये लाडली बहना योजना चालू करण्यात आलेली होती, हीच योजना आता महाराष्ट्रामध्ये माझी लाडकी बहीण योजना म्हणून चालू करण्यात आलेली असून या योजनेच्या माध्यमातून महिलांना दर महिन्याला 1500 रुपये दिले जाणार आहे, या योजने अंतर्गत ज्या महिला पात्र ठरणार आहेत अशा महिलांना ऑनलाईन किंवा ऑफलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे.
अर्ज प्रक्रिया पूर्ण करत असताना महिलांना विविध प्रकारच्या अडचणीला सामोरे जावे लागत आहे, अनेक महिलांनी माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज अंगणवाडी केंद्रामध्ये जाऊन ऑफलाइन पद्धतीने भरलेला आहे, तर अनेक महिलांनी ऑनलाईन पद्धतीने सुद्धा अर्ज भरलेला आहे, अशा स्थितीमध्ये माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज करत असताना एक हमीपत्र त्यासोबत अपलोड करावे लागते, ते हमीपत्र कसे अपलोड करावे हे अनेकांना कळलेले नाही.
सर्व प्रथम हमीपत्र वर देण्यात आलेले एकूण दहा मुद्दे योग्य प्रकारे वाचून घ्या, मुद्द्यापुढे देण्यात आलेल्या चौकोनी बॉक्समध्ये टीक करावी, म्हणजे राईटची चिन्ह करावे त्यानंतर खाली नाव, गाव तसेच सही करावी, सर्व झाल्यानंतर हमी पत्राच्या कॉलम मध्ये हमीपत्र वर क्लिक करून ते अपलोड करा. अत्यंत सहजरित्या अशा पद्धतीने हमीपत्र अपलोड करता येणार आहे. त्याचबरोबर महिलांच्या खात्यावर 15 ऑगस्ट रोजी म्हणजे रक्षाबंधनच्या वेळेवर शासनाच्या माध्यमातून जुलै व ऑगस्ट या दोन्ही महिन्याचे एकूण तीन हजार रुपये जमा केले जाणार आहे.
शेतकऱ्यांनो तननाशक फवारणी करताना या महत्त्वाच्या बाबी लक्षात ठेवा, व काळजी घ्या अन्यथा..