महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यांमध्ये माझी लाडकी बहीण योजना चालू करण्यात आलेली असून, या योजनेअंतर्गत 31 ऑगस्ट 2024 पर्यंत महिलांना अर्ज प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे, आतापर्यंत अनेक महिलांनी अर्ज प्रक्रिया पूर्ण केलेली असून अनेक महिलांचे अर्ज मंजूर करण्यात आलेली आहे,परंतु अर्ज मंजूर झाल्यानंतर सुद्धा महिलांना एक प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे, कारण ती प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होऊ शकणार नाही, त्यामुळे याबाबत महिलांनी खात्री बाळगावी.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून देण्यात आलेल्या भाषणामध्ये सांगण्यात आलेले होते की रक्षाबंधनच्या दिवशी शासनाच्या माध्यमातून जुलै महिन्याचे दीड हजार व ऑगस्ट महिन्याचे दीड हजार असे एकूण तीन हजार रुपये महिलांच्या खात्यावर जमा केली जाणार आहे, त्यामुळे येत्या काही दिवसातच महिलांच्या खात्यावर एकूण तीन हजार रुपये जमा केले जातील ही प्रक्रिया लवकरात लवकर महिलांनी पूर्ण करावी.
महिलांचे कोणते बँक खाते आपल्या आधार कार्डशी संलग्न आहे म्हणजेच आपले बँक खाते आधार कार्ड लिंक असणे गरजेचे आहे, पण त्यामुळे तुम्ही चेक करू शकता जर तुमचे बँक खाते आधार कार्ड शी लिंक नसेल तर तुम्ही लवकरच आपल्या बँक शाखेमध्ये जाऊन आधार कार्डशी बँक खाते लिंक करून घ्यावे अन्यथा महिलांना 3 हजार रुपये मिळू शकणार नाही, अशा प्रकारची अत्यंत महत्त्वाची बातमी राज्यातील माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज मंजूर झालेल्या महिलांसाठी ची आहे.
राज्य शासनाचा मोठा निर्णय, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई 3 हेक्टर पर्यंत मिळणार