तुमच्या मोबाईलवर जर असा मेसेज आला असेल, तर 17 तारखेला लाडकी बहीण योजनेचे 3 हजार तुम्हाला मिळणार | Ladaki Bahin Yojana 

महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून माझी लाडकी बहीण योजना राबवली जात आहे, या योजनेची घोषणा 28 जून 2024 रोजी शासनाच्या माध्यमातून करण्यात आलेली होती, व 31 ऑगस्ट 2024 पर्यंत या योजनेसाठी महिलांना अर्ज प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे, व सध्याच्या स्थितीमध्ये येणारा काळ रक्षाबंधनचा असल्याने राज्य शासनाच्या माध्यमातून महिलांच्या खात्यावर एकूण तीन हजार रुपये म्हणजेच जुलै महिन्याचे व ऑगस्ट महिन्याचे असे एकूण तीन हजार रुपयांची रक्कम महिलांच्या खात्यावर पाठवली जाणार आहे. 

 

अनेक महिलांना कळालेले नाही की आपल्याला पैसे नक्की मिळणार की नाही त्यामुळे तुम्ही जर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज केलेला असेल व तुम्हाला तुमच्या मोबाईलवर तुमचा अर्ज मंजूर झालेला आहे असे आलेले असेल तर तुम्हाला अर्थातच 17 तारखेला शासनाच्या माध्यमातून एकूण तीन हजार रुपयांची रक्कम मिळणार आहे.

 

शासनाच्या माध्यमातून महिलांच्या खात्यावर एक एक रुपयांचे पेमेंट केलेले आहे तुमच्या खात्यावर जर एक रुपयाची पेमेंट झालेले असेल व शासनाच्या माध्यमातून तुम्हाला Your application no for MMLBY has approved – WCD, GOM – MAHGOV” असा मेसेज आलेला असेल तर अर्थातच तुम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र झालेले आहात व तुम्हाला येणारे पैसे जमा होऊन तुम्हाला लाभ दिला जाणार आहे.

 

कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार एवढे अनुदान, अर्ज प्रक्रिया सुरू लगेच अर्ज करा