मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अर्ज प्रक्रियेची मुदत वाढ केली, योजनेचे अर्ज निरंतर महिलांना भरता येणार कोणतीही कालमर्यादा नाही | Ladaki Bahin Yojana 

महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत अर्ज प्रक्रिया चालू मागील काही दिवसांमध्ये झालेली आहे, तसेच अनेक महिलांच्या खात्यावर जुलै महिन्याचे दीड हजार रुपये व ऑगस्ट महिन्याचे दीड हजार रुपये असे एकूण तीन हजार रुपये जमा झालेले आहे, तर अनेक महिलांना 17 तारखेपर्यंत या पैशाचा लाभ दिला जाणार आहे योजनेच्या माध्यमातून अनेक महिला पात्र ठरलेल्या असून त्यांना अप्रुड अशा प्रकारचे मेसेज सुद्धा आपल्या मोबाईलवर प्राप्त झालेले आहे. 

 

शासनाच्या माध्यमातून 31 ऑगस्ट ही तारीख अर्ज करण्याची शेवटची तारीख ठरवण्यात आलेली होती, परंतु पुन्हा एकदा शासनाच्या माध्यमातून सांगण्यात आलेले आहे की, महिलांना कोणत्याही प्रकारचे टेन्शन न घेता महिलांना निरंतर ही अर्ज प्रक्रिया पूर्ण करून योजनेचा लाभ घेता येणार आहे, त्यामुळे योजना अंतर्गत 31 ऑगस्ट नंतर जारी अर्ज केला तरी सुद्धा महिलांना योजनेचा लाभ दिला जाईल.

 

ज्या महिलांनी अर्ज प्रक्रिया पूर्ण केलेली आहे व त्या महिला संपूर्ण अटींमध्ये पात्र असतील अशा महिलांना सुद्धा पैसे मिळणार की नाही अशा प्रकारचा प्रश्न उपस्थित झालेला आहे कारण अनेक महिलांचे आधार कार्ड बँक खात्याची लिंक नसल्याने त्यांना अडचणी दाखवल्या जात आहे, त्यामुळे अशा महिलांनी जेव्हा बँक खात्याशी आधार लिंक पूर्ण केले तेव्हा त्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ दिला जाईल म्हणजेच त्या महिलांच्या खात्यावर पैशाचे वितरण होईल.

 

शासनाच्या माध्यमातून अनेक महिलांच्या खात्यावरती 3 हजार रुपयांची रक्कम पाठवणे चालू झालेले आहे, अनेक महिलांच्या खात्यावर महिलांना रक्कम तीन हजार रुपयांची प्राप्त झालेली आहे, रक्षाबंधनच्या निमित्य शासनाच्या माध्यमातून या कालावधीमध्ये रक्कम वितरित केलेली आहे, त्यामुळे महिलांना एक प्रकारे आपल्या भावाकडून रक्षाबंधन चे गिफ्ट मिळालेले आहे, अशा प्रकारे महिलांसाठीची अत्यंत महत्त्वाची बातमी असून महिलांना निरंतर अर्ज प्रक्रिया केव्हाही पूर्ण करता येईल.

 

नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार प्रोत्साहनपर अनुदान, अनुदान मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना ही प्रक्रिया पूर्ण करावी लागणार