माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज चुकला असेल, तर लगेच अशा पद्धतीने दुरुस्त करा | Ladki Bahin Yojana 

राज्य शासनाच्या माध्यमातून 28 जून 2024 रोजी माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आलेली आहे, व या योजनेच्या माध्यमातून सर्वसामान्य महिलांना लाभ घेता येणार आहे त्यामुळे योजनेअंतर्गत अनेक महिलांनी अर्ज प्रक्रिया पूर्ण केलेली आहे परंतु अनेकांची अर्ज प्रक्रिया चुकल्याने पैसे मिळणार की नाही याची चिंता त्यांना भेडसावत आहे त्यामुळे अर्ज किंवा कागदपत्रे अपलोड करताना काही चूक झाली असेल माहिती देताना चुकीची माहिती गेली असेल तर अत्यंत सहजरित्या अर्जामध्ये दुरुस्ती करता येणार आहे. 

 

अर्जामध्ये चुकी झाली असल्यास त्याला पुन्हा बरोबर करण्यासाठी सर्वप्रथम प्ले स्टोअर मध्ये जाऊन नारीशक्ती ॲप डाऊनलोड करा, त्यामध्ये अपडेट आलेले असेल ते अपडेट करून ओपन करा. त्यामध्ये जो मोबाईल क्रमांक टाकलेला होता तो एंटर करून एक्सेप रिटर्न अँड कंडिशन यावर क्लिक करा. लॉगिन वर क्लिक करून स्वीकारा बटन वर क्लिक करा, तुमच्या मोबाईल क्रमांकावर आलेला ओटीपी एंटर करावा.

 

तुम्ही जेवढे अर्ज केलेले आहे ते संपूर्ण दाखवले जाईल त्या फॉर्ममध्ये तुम्हाला दुरुस्ती करायची असेल तो फॉर्म निवडा, फार्म ओपन झाल्यानंतर संपूर्ण माहिती तपासून कोणती माहिती चुकीची आहे ते बघावी, व उजव्या साईडच्या असलेल्या एडिट बटनवर क्लिक करा. भरलेल्या अर्जामध्ये तुम्हाला फक्त एकदाच बदल करता येणार आहे पुन्हा बदल करता येणार नाही त्यामुळे संपूर्ण माहिती योग्य वाचावी व चुकीची माहिती योग्य करावी व माहिती देत असताना आधार कार्डवर ज्याप्रकारे पत्ता अशा प्रकारची संपूर्ण माहिती आधार कार्ड नुसार द्यावी.

 

अपलोड करण्यात आलेले डॉक्युमेंट सुद्धा बदलायचे असेल तर बॉक्समध्ये असलेल्या फुल्लीवर क्लिक करून दुसरे डॉक्युमेंट अपलोड करता येणार आहे अशाप्रकारे फक्त एकदाच योग्य प्रकारे संपूर्ण अर्ज दुरुस्त करावा, त्यानंतर माहिती अपडेट करा या ऑप्शन वर क्लिक करा त्यानंतर तुम्ही योग्य प्रकारे भरलेली संपूर्ण माहिती दिली जाईल. फॉर्म सबमिट करा ओटीपी टाका, व सबमिट करा अशाप्रकारे लाडकी बहीण योजनेच्या अर्ज प्रक्रियेत काही चूक झाली असेल तर दुरुस्ती करता येऊ शकते.

 

आता व्हॉटस् ॲप तसेच कॉल वर करा पिक विमा न मिळणे, अनुदान न मिळणे अश्या विविध बाबींची तक्रार