महामेष योजनेमध्ये शासनाने केले मोठे बदल, डीबीटी च्या माध्यमातून लाभार्थ्यांच्या थेट खात्यात होणार रक्कम जमा | Mahamesh Yojana 

महामेष योजना राबवली जाते या योजनेअंतर्गत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पनांमध्ये बोलताना काही माहिती देऊन योजनेत थोड्या प्रमाणात बदल करण्यात आलेली आहे व मेंढपाळांसाठी हे बदल चांगले फायदेशीर ठरू शकतात, कारण 23 जुलै 2024 रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बजेटमध्ये सांगत असताना अर्थमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार महामेष योजनेची लाभार्थ्यांच्या खात्यात थेट डीबिटी च्या माध्यमातून पैशाचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती दिली, व ही योजना अशाच प्रकारे पुढे सुद्धा लाभ मिळण्यात येणार असल्याची माहिती देऊन लाभार्थ्यांच्या खात्यात रुपये जमा होणार असल्याने प्रक्रिया थेट चांगल्या पद्धतीने पूर्ण होऊन अगदी सात दिवसाचा कालावधीमध्ये पैसे थेट लाभार्थ्याच्या खात्यात जमा होणार आहे. 

 

धनगर समाजामध्ये असलेले मागासले पण योजनेच्या माध्यमातून दूर होऊ शकते, अशा प्रकारचे उद्देश योजनेच्या माध्यमातून ठेवण्यात आलेले असून, या योजनेची व्याप्ती वाढवण्याचा निर्णय सुद्धा घेण्यात आलेला असून, व्याप्ती वाढवण्यासाठी तरतूद करण्यात आलेली आहे, व त्यानुसार 29 कोटी 55 लाख एवढा निधी या वर्षांमध्ये खर्च करण्यास मान्यता देण्यात आलेली असून, पशु खरेदी च्या किमतीनुसार 75 टक्के एवढी रक्कम सात दिवसांमध्ये लाभार्थ्याच्या खात्यामध्ये जमा केली जाणार आहे, म्हणजे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पैशाचे वितरण होईल.

 

लाभार्थ्याला सर्वप्रथम स्वखर्चाने महामंडळाच्या प्रक्षेत्रावरुन अथवा जनावरांच्या अधिकृत बाजारातून समितीच्या उपस्थितीमध्ये खरेदी करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे, व जनावरांच्या खरेदीनंतर लाभार्थ्याच्या खात्यावर येत्या सात दिवसातच 75 टक्के एवढी रक्कम जमा केली जाईल, कोणत्या भावामध्ये खरेदी करण्यात आली याबाबतच्या प्रत्येकी पावत्या तसेच मंडळा सोबत असलेले फोटो अशा प्रकारचे संपूर्ण पुरावे महामंडळाकडे जमा करावे लागणार आहे, त्यानंतर संपूर्ण प्रोसेस केली जाईल अशा प्रकारे महामेष योजनेमध्ये चांगल्या प्रकारे बदल करण्यात आलेले आहे.

 

शेती पिकांवर अळी व किडीचा अटॅक, शेतकरी चिंतेत, शेतकऱ्यांनी काय करावे हा प्रश्न?