शिंदे सरकारचा निर्णय, लाडक्या बहिणींना मिळणार मोफत तीन सिलेंडर | Mofat Cylinder

राज्य शासनाच्या माध्यमातून महिलांसाठी विविध प्रकारच्या योजना राबविल्या जात आहे, व येणारा काळ विधानसभा निवडणुकीचा असल्याने सत्तेमध्ये असणाऱ्या सरकारच्या माध्यमातून विविध प्रकारच्या योजनांची घोषणा सुद्धा केली जात आहे, 28 जून 2024 रोजी विविध प्रकारच्या योजनांची घोषणा करण्यात आलेली होती, त्यामध्ये महिलांसाठी राबवली गेलेली माझी लाडकी बहिण योजना या योजनेची घोषणा केलेली होती, या योजनेच्या माध्यमातून महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये दिले जाणार आहे, अशाच प्रकारची महिलांसाठी महत्त्वपूर्ण योजना चालू करण्याची ही देण्यात आलेली होती ती योजना म्हणजेच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना होय.

 

अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून महिलांना दर वर्षी तीन सिलेंडर मोफत दिले जाणार होते, या योजनेच्या अंतर्गत मोठ्या प्रमाणात महिला पात्र ठरणार आहे या योजनेच्या माध्यमातून फक्त उज्वला गॅस योजनेच्या लाभार्थी महिलांनाच लाभ दिला जाणार होता परंतु आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या म्हणण्यानुसार ज्या महिला माझी लाडकी बहीण योजनेस पात्र पडतील अशा कुटुंबातील एका महिलेला मोफत तीन सिलेंडर दिले जाण्याचा शासनाचा निर्णय आहे.

 

अशाप्रकारे ज्या महिला माझी लाडकी बहीण योजनेस पात्र ठरतील अशा महिलांना वार्षिक 3 सिलेंडर दिले जाणार आहे, व अशातच आता उज्वला गॅस योजनेच्या लाभार्थी महिलांबरोबरच अशा महिलांना सुद्धा वार्षिक 3 सिलेंडर दिले जाणार आहे, त्यामुळे तीन सिलेंडरच्या पैशाची बचत सुद्धा केली जाणार आहे, शासनाच्या माध्यमातून सिलेंडरचे पैसे दिले जाईल म्हणजेच मोफत सिलेंडर महिलांना मिळणार आहे.

 

माझी लाडकी बहीण योजनेचे हमीपत्र अशा पद्धतीने अपलोड करावे लागणार