महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, शेतकऱ्यांना मिळणार पुढील पाच वर्षे मोफत वीज, शासनाची नवीन मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना | Mofat Vij Yojana 

राज्य शासनाच्या माध्यमातून विविध प्रकारच्या योजनांची घोषणा केली जात आहे येणारा काळ विधानसभा निवडणुकीचा आहे व शेतकरी सर्वसामान्य नागरिक महिलांसाठी विविध प्रकारच्या योजना राबवल्या जात आहेत, अशातच महिलांसाठी सुद्धा अनेक योजना चालू करण्यात आलेल्या असून, शेतकऱ्यांसाठी चालू करण्यात येणारी एक योजना म्हणजेच मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना होय. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील सर्व शेतकऱ्यांना एक प्रकारचा दिलासा मिळणार आहे, आर्थिक बचत होऊन शेतकऱ्यांना मोफत वीज पुरवठा सुद्धा होणार आहे. 

 

राज्यातील अनेक शेतकरी मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेअंतर्गत पात्र ठरणार आहे, कारण जे शेतकरी 7.5 एचपी कृषी पंप वापरतात, अशा शेतकऱ्यांना मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार आहे म्हणजेच असे शेतकरी योजनेस पात्र ठरतील व त्यांना 2029 पर्यंत योजनेअंतर्गत लाभ घेता येणार आहे, या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे, मोफत वीज उपलब्ध होऊ शकेल.

 

44 लाखाहून अधिक शेतकऱ्यांना मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेचा लाभ मिळणार आहे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा हा निर्णय घेतलेला आहे, शेतकरी 7.5 एचपी पेक्षा कमी क्षमतेचे कृषी पंप वापरतात अशांना योजनेच्या माध्यमातून लाभ घेता येणार आहे, परंतु जे शेतकरी या 7.5 एचपी पेक्षा जास्त क्षमतेचे कृषी पंप वापरतील अशांना मात्र वीज बिल भरावे लागेल.

 

शिंदे सरकारचा निर्णय, लाडक्या बहिणींना मिळणार मोफत तीन सिलेंडर