राज्य शासनाचा मोठा निर्णय, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई 3 हेक्टर पर्यंत मिळणार | Nukasan Hectari Sheti 

राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठीचा अत्यंत मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे, तर दरवर्षी शेती करत असताना शेती पिकाचे कोणत्या ना कोणत्या नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान होत असते कधी पूर परिस्थिती अतिवृष्टी तर कधी दुष्काळ परिस्थिती निर्माण होते अशा स्थितीमध्ये शेती पिकाचे मोठे नुकसान झाले असता शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाते, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देत असताना शासनाच्या माध्यमातून अनेक वेळा दोन हेक्टर पर्यंत मर्यादेची अट ठेवण्यात आलेली होती, परंतु आता शेतकऱ्यांना तीन हेक्टर पर्यंतची नुकसान भरपाई देण्याचा निर्णय राज्य शासनाच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे. 

 

शेतीवर आलेल्या मोठ्या संकटामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते व शेती करत असताना मोठ्या प्रमाणात शेतकरी कर्जबाजारी होऊन शेती करतात परंतु शेतीमध्ये अशा प्रकारचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसतो, व त्यांनी घेतलेले कर्ज सुद्धा त्यांना फेडता येणे कठीण होते, अशा स्थितीमध्ये शेतकऱ्यांना हेक्टरी 3 हेक्टरच्या मर्यादेमध्ये अनुदान दिले जाणार असल्याची बाब सांगितली जात आहे.

 

नुकसान भरपाई चे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये दिले जातील व हे पैसे शेतकऱ्यांच्या डीबीटीच्या माध्यमातून खात्यावर पाठवले जाणार, शासनाने घेतलेल्या अशा निर्णयामुळे एक प्रकारे शेती पिकाला चालना सुद्धा मिळू शकते अशा प्रकारचा महत्त्वाचा निर्णय असून या निर्णयामुळे अनेक शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो, व आर्थिक मदतीमुळे शेतकरी स्वावलंबी होऊन आपल्या शेतीमध्ये पुन्हा एकदा कार्यरत होऊ शकतात.

 

शेतकऱ्यांनो लगेच आपल्या सातबाऱ्यावर पिकांची माहिती नोंदवा, बघा संपूर्ण प्रोसेस