पीएम किसान योजनेअंतर्गत आले नवीन अपडेट, आता बदलता येणार मोबाईल नंबर, असा बदला मोबाईल नंबर | PM Kisan Yojana 

केंद्र शासनाच्या माध्यमातून देशामध्ये पीएम किसान योजना राबवली जाते, या योजनेअंतर्गत देशातील अनेक शेतकरी लाभ घेतात, आतापर्यंत 17 हप्त्यांचा लाभ अनेक शेतकऱ्यांनी घेतलेला आहे, त्यासोबतच पीएम किसान योजनेअंतर्गत पात्र ठरण्यासाठी विविध प्रकारच्या अटी ठरवण्यात आलेल्या आहे, त्यामध्ये आधार कार्ड ला मोबाईल क्रमांक लिंक असणे गरजेचे आहे, आणि शेतकऱ्यांनी पीएम किसान योजनेअंतर्गत पूर्वी जो मोबाईल क्रमांक दिलेला होता तो चुकीचा असल्यास किंवा मोबाईल क्रमांक बदलला असल्यास नवीन मोबाईल क्रमांक पी एम किसान योजनेमध्ये टाकण्याचे ऑप्शन नव्हते,परंतु आता हे नवीन अपडेट आलेले असून नवीन मोबाईल क्रमांक टाकता येणार आहे. 

 

शेतकऱ्यांनो तुम्ही जर पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल व तुम्हाला योजने अंतर्गत नवीन मोबाईल क्रमांक प्रविष्ट करायचा असेल तर अत्यंत सहजरित्या मोबाईल क्रमांक प्रविष्ट करता येणार आहे, त्यासाठी सर्वप्रथम, पी एम किसानच्या वेबसाईटला ओपन करा, त्यामध्ये अपडेट मोबाईल नंबर हे नवीन ऑप्शन आलेले आहे त्यावर क्लिक करा, त्यामध्ये रजिस्टर नंबर व आधार कार्ड टाकून सर्च करायचे आहे.

 

कॅपचा कोड टाकून सर्च बटन वर क्लिक करा, त्यानंतर मोबाईल नंबर टाकून गेट आधार ओटीपी वर क्लिक करा, आलेला ओटीपी इंटर करून व्हेरिफाय ओटीपी वर क्लिक करा. ओके करून शेतकऱ्यांचा संपूर्ण डिटेल्स दाखवल्या जातील, तुम्ही जो मोबाईल क्रमांक टाकलेला पुर्वी टाकलेला होता त्या ऐवजी दुसरा नवीन मोबाईल क्रमांक बॉक्समध्ये इंटर करा, गेट ओटीपी वर क्लिक करा तुमच्या मोबाईल क्रमांक वर आलेला ओटीपी इंटर करून व्हेरिफाय ओटीपी वर क्लिक करा. अशा पद्धतीने तुमचा नविन मोबाईल क्रमांक अपडेट करता येईल.

 

रिचार्ज महाग झाले म्हणून BSNL मध्ये सिम पोर्ट करताय! त्या पूर्वी तुमच्या परिसरात BSNL नेटवर्क आहे की नाही ते चेक करा ऑनलाईन