शासनाच्या माध्यमातून रेशन कार्ड धारक नागरिकांना अन्नधान्याचा पुरवठा करण्यात येतो, सरकारच्या माध्यमातून दिवसेंदिवस विविध क्षेत्रांमध्ये सुलभता आणली जात आहे, म्हणजेच पात्र नागरिकांनाच लाभ देण्यात यावा यामुळे विविध प्रकारच्या प्रक्रिया अवलंबविण्यात येत आहे, व आता रेशन कार्ड धारक नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी असून, त्यांना मिळत असलेले अन्नधान्य जर इथून पुढे सारखे चालू ठेवायचे असल्यास त्यांना रेशन कार्ड सोबत आधार कार्ड लिंक करणे अत्यंत महत्त्वाचे आहे, आणि रेशन कार्डधारकांना ही बाब माहिती नसून रेशन कार्ड सोबत आधार कार्ड लिंक न केल्यास त्यांचे रेशन मिळणे बंद सुद्धा होऊ शकते.
रेशन कार्ड धारक नागरिकांना गेल्या काही दिवसापासून मोफत रेशन दिले जात आहे, त्यामुळे गैरप्रकरण होऊन अपात्र असलेले नागरीक अन्नधान्याचा लाभ घेऊ नये यासाठी प्रक्रियेमध्ये सुलभता आणली जात आहे, व त्यामुळे रेशन कार्ड सोबत आधार कार्ड लिंक करणे अनिवार्य करण्यात आलेले आहे, रेशन सोबत आधार कार्ड लिंक करण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी असून घरबसल्या मोबाईलवरून सुद्धा सर्वसामान्य व्यक्तीला पूर्ण करता येणार अशा प्रकारची आहे.
रेशन कार्ड सोबत आधार कार्ड लिंक करण्यासाठी सर्वप्रथम रेशन कार्ड च्या वेबसाईटला ओपन करा, त्यानंतर लॉगिन करा, आधार लिंक विथ रेशन कार्ड या ऑप्शन वर क्लिक करा, त्यानंतर रेशन कार्ड नंबर टाका, विचारली गेली संपूर्ण माहिती योग्य प्रकारे भरा, त्यामध्ये तुमच्या कुटुंबातील व्यक्तींची संख्या त्यांची नावे, तसेच आधार कार्ड क्रमांक, आधार कार्ड ची लिंक असलेला मोबाईल क्रमांक टाका त्यावर आलेला ओटीपी इंटर करून सबमिट बटनवर क्लिक करा. अशा पद्धतीने तुमचा अर्ज स्वीकारला जाईल, अशा पद्धतीने रेशन कार्ड ला आधार कार्ड लिंक करता येणार आहे.