शेती पिकांवर अळी व किडीचा अटॅक, शेतकरी चिंतेत, शेतकऱ्यांनी काय करावे हा प्रश्न? | Shetkri Chintit 

यावर्षी खरीप हंगाम 2024 च्या कालावधीत पूर्वीपासून चांगल्या प्रकारे पाऊस शेतीला उपलब्ध होत आहे, गेल्यावर्षीपेक्षा पावसाची परिस्थिती राज्यांमध्ये चांगल्या प्रमाणात बघायला मिळत आहे, त्यामुळे पिके सुद्धा पाण्याने तृप्त झालेली असून चांगली वाढत आहे परंतु असे पाणी चांगल्या प्रमाणात उपलब्ध असताना सुद्धा शेतकरी मात्र चिंतेत झालेला आहे, कारण सतत येणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांना आपल्या शेतातील पिकांवर वारंवार कीटकनाशकांची फवारणी करावी लागत आहे व वारंवार फवारणी करून सुद्धा पिकांवर कोणताही फरक बघायला मिळत नाहीये. 

 

कारण सतत येणाऱ्या पावसामुळे फवारणी केलेली वाया जात आहे व पिकांवरील कीटक नाश पावत नाही आहे त्यामुळे वारंवार अनेक शेतकऱ्यांनी कापूस, सोयाबीन, तूर त्यासह विविध प्रकारच्या पिकांवर आतापर्यंत मोठ्या प्रमाणात फवारण्या केलेल्या आहेत, परंतु या फवारण्याचा जास्त प्रमाणात चांगला फरक पडलेला नाही कारण फवारण्या करून सुद्धा अळीचा व कीटकांचा यासह इतरही प्रकारच्या किटकांचा समावेश पिकांवर बघायला मिळतो आहे.

 

पिकांवर म्हणजे त्यामध्ये सोयाबीन व कापूस पिकावर मोठ्या प्रमाणात अळ्यांची संख्या असल्याने येणाऱ्या उत्पादनात सुद्धा यामुळे घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे, त्यामुळे अनेक शेतकरी चिंतेत झालेले आहे कारण, पिके चांगली असून सुद्धा जास्त अळ्यांच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्याला पुढे नुकसान भोगावे लागू शकते, त्यामुळे शेतकऱ्यांना अशा स्थितीत एक प्रकारचे मार्गदर्शन हवे आहे व त्यामुळे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी म्हणजे शेतकऱ्यांच्या पिकावर मोठ्या प्रमाणात अळ्यांचा प्रादुर्भाव झालेला असेल तर कृषी विभागाशी संपर्क साधून शेतकऱ्यांना योग्य ते मार्गदर्शन घेता येणार आहे व आपल्या पिकांच्या उत्पादनात भर सुद्धा पडता येणार.

 

मागेल त्याला सोलार पंप योजनेअंतर्गत लगेच अशा पद्धतीने अर्ज करा, बघा आवश्यक कागदपत्रे व संपूर्ण प्रोसेस