सिबिल स्कोर म्हणजे काय? शेतकऱ्यांचा कर्ज घेताना सिबिल स्कोर विचारात घेतल्यास लगेच एफ आय आर दाखल होणार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | Sibil Score 

अनेकांना अजूनही सिबिल स्कोर म्हणजे नक्की काय आहे? हे माहित नाही, तसेच हा सिबिल स्कोर शब्द अनेकांनी ऐकलेला जरी असला तरी त्याचा अर्थ काय होतो, याची माहिती अनेकांना नसते तर शेतकरी जेव्हा आपल्या शेतीत पेरणी करतो तेव्हा त्याला एक प्रकारे पीक कर्जाची आवश्यकता असते, पैसे उपलब्ध नसल्याने पीक कर्ज तो काढण्यासाठी बँकेमध्ये जातो परंतु त्या ठिकाणी शेतकऱ्याचा सिबिल स्कोर बघितला जातो, व त्यानंतरच पुढील स्कोर चांगला असेल तरच त्या शेतकऱ्याला कर्ज दिले जाते त्यामुळे आपला सिबिल स्कोर चांगला असणे गरजेचे आहे. 

 

बँकेच्या माध्यमातून आतापर्यंत अनेक शेतकऱ्यांना सिबिल स्कोर चांगला नसल्याने किंवा सिबिल स्कोर लक्षात घेऊन कर्ज दिलेली नाही, त्यामुळे अशाप्रकारे सिबिल स्कोर ची अट आता कर्ज देताना लक्षात घेतली जाणार नाहीये,कारण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांना पीक कर्ज काढताना सिविल स्कोर मागितला जाणार नाही म्हणजे लक्षात घेतला जाणार नाही जर कर्ज देत असताना सिबिल स्कोर चांगला नाही हे कारण सांगून कर्ज नाकारले तर अशा ठिकाणी लगेच एफ आय आर दाखल केला जाईल.

 

क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो ऑफ इंडिया लिमिटेड असा सिबिल स्कोर चा फुल फॉर्म आहे. त्यात नेमका सिबिल स्कोर म्हणतात कशाला हे अनेकांना माहीत नसल्याने, सिबिल स्कोर म्हणजे या नागरिकांनी आतापर्यंत बँकेत कर्ज काढून कर्ज देवाणघेवाण केलेली असेल, ती जर व्यवस्थित कालावधीमध्ये केलेली असेल तर त्या व्यक्तीचा सिबिल स्कोर 700 पेक्षा जास्त असेल तर तो सिबिल स्कोर चांगला मानला जातो, व अशा व्यक्तीला कर्ज दिले जाते परंतु आता सिबिल स्कोर लक्षात न घेता शेतकऱ्यांना पीक कर्ज दिले जाईल.

 

महाडीबीटी च्या माध्यमातून ठिबक व तुषार सिंचनासाठी निवड झालेली असल्यास शेतकऱ्यांनो लगेच ही कागदपत्रे अपलोड करा