कुसुम सोलार पंप योजना अंतर्गत 95 टक्के अनुदानावर शेतकऱ्यांना मिळणार सोलार पंप, अर्ज सुरू | Solar Pamp 

राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी महा ऊर्जाच्या माध्यमातून कुसुम सोलर पंप योजना साठीचे अर्ज मागविले जात आहे, त्यानंतर शेतकऱ्यांना कुसुम सोलार पंप योजना अंतर्गत 95 टक्के अनुदानावर सोलार पंप हवा आहे, अशे शेतकऱ्यांना ऑनलाइन पद्धतीने अत्यंत सहजरित्या अर्ज प्रक्रिया पूर्ण करून योजनेच्या माध्यमातून लाभ घेता येणार आहे. त्यामुळे कुसुम सोलार पंप योजना अंतर्गत अर्ज करताना लागणारी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत? तसेच अर्ज प्रक्रिया शेतकऱ्यांना कशा पद्धतीने पूर्ण करावी लागणार? अशा प्रकारची संपूर्ण माहिती खालील प्रमाणे जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात.

 

अर्ज करत असताना शेतकऱ्यांकडे काही आवश्यक कागदपत्रांची उपलब्धता असणे गरजेचे आहे, त्यामध्ये अर्ज करत असणाऱ्या अर्जदाराचे आधार कार्ड उपलब्ध असावे, अर्जदाराच्या नावे असणाऱ्या जमिनीचा सातबारा त्या सातबारा वरती वीहीर किंवा बोरवेल याची नोंदणी आवश्यक आहे, त्यासोबतच पासपोर्ट साईज फोटो सुद्धा अर्जदाराकडे उपलब्ध असावे व बँक खाते उपलब्ध असावे, अशा प्रकारची संपूर्ण कागदपत्रे अर्ज करत असताना अर्जदाराकडे उपलब्ध असावे लागणार आहे.

 

अर्जदार व्यक्तीला सोलार पंप योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर सर्वप्रथम अधिकृत वेबसाईट ओपन करावी,संपूर्ण माहिती योग्य प्रकारे भरावी त्यानंतर प्रोसेस बटनवर सिलेक्ट करा, त्यानंतर पेमेंट करावे लागेल सहा रुपये एवढी पेमेंट अर्जदाराला करावी लागणार आहे, मोबाईल क्रमांक वर आलेला आहे एंटर करून, मोबाईल क्रमांक वर आलेला युजरनेम व आयडी इंटर करून लॉगिन करा. संपूर्ण माहिती भरून सोलार पंप सिलेक्ट करून आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी व त्यानंतर शेवटी अर्ज सबमिट करावा अशा प्रकारे अर्जदार व्यक्तीला अत्यंत सहजरित्या अर्ज प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे.

 

शेती पिकांवर अळी व किडीचा अटॅक, शेतकरी चिंतेत, शेतकऱ्यांनी काय करावे हा प्रश्न?