कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार 10 हजार रुपयांचे अनुदान, तुम्हाला मिळणार का अनुदान? | Soyabin Anudan 

खरीप हंगाम 2023 मध्ये अनेक शेतकऱ्यांनी कापूस व सोयाबीन पिकांची लागवड केलेली होती परंतु अशा स्थितीमध्ये अवेळी येणाऱ्या पावसामुळे तसेच मधेच पडलेल्या दुष्काळ परिस्थितीमुळे कापूस व सोयाबीन अशा प्रकारच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात अतोनात नुकसान झालेले होते, अशा स्थितीमध्ये कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकरी हवालदिल झालेला होता, व शेतकऱ्याला शेतीवरील केलेला खर्च सुद्धा निघिनासा झाल्याने चिंता भासत होती, अशा स्थितीमध्ये खरीप हंगाम 2023 मधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. 

 

कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना आता हेक्टरी पाच हजार रुपये प्रमाणे अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आलेला असून दोन हेक्टर पर्यंतची मर्यादा असणार आहे, यामध्ये कापूस व सोयाबीन पिकांचा समावेश आहे, शासनाच्या माध्यमातून गेल्या काही दिवसांपूर्वी घोषणा करण्यात आलेली होती की, कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान झालेले असल्याने त्यांना अनुदान देण्यात येणार आहे, व याच घोषणेनुसार येत्या काही दिवसातच शेतकऱ्यांच्या खात्यावर हेक्टरी पाच हजार रुपये प्रमाणे अनुदान वितरित केले जाणार आहे.

 

कापूस व सोयाबीन या दोन्ही पिकांचा एकूण निधी मिळून 4198.68 कोटी रुपये एवढा निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे, त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी खरीप हंगाम 2023 मध्ये आपल्या पिकांची ई पीक पाहणी केलेली होती, म्हणजेच कोणते किती क्षेत्र सोयाबीन व किती क्षेत्र कापसाचे होते अशा प्रकारची पीक पाहणी केलेली असेल तर पाहणीनुसारच शेतकऱ्यांना अनुदान पिकांसाठीचे दिले जाणार आहे, अशा प्रकारे कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे.

शेतकऱ्यांना मिळणार 100 टक्के अनुदानावर बॅटरी फवारणी पंप, या तारखेपर्यंत अर्ज करा