अनेक शेतकऱ्यांच्या पेरण्या गेल्या महिन्यामध्ये पूर्ण झालेल्या आहे व राहिलेल्या शेतकऱ्यांनी सुद्धा पेरणीला सुरुवात केलेली आहे, ज्या शेतकऱ्यांच्या पेरणीला पंधरा ते वीस दिवस किंवा त्यापेक्षा जास्त दिवसांचा कालावधी झालेला असेल अशा शेतकऱ्यांच्या शेतामध्ये अर्थातच तन उगवलेले असेल, व तनाचा नाश करण्यासाठी शेतकरी विविध प्रक्रियेचा उपयोग शेतकरी करताना दिसतात त्यामध्ये खुरपणी करणे व सर्वात जास्त वापरले जाणारे तन नाशक फवारणी सुद्धा मोठ्या प्रमाणात शेतीमध्ये केली जात आहे, परंतु तन नाशक फवारणी करत असताना काही महत्त्वाच्या बाबी लक्षात घेऊनच तणनाशक फवारणी शेतकऱ्यांनी करावी.
कोणत्याही प्रकारची माहिती नसताना शेतकरी कोणत्याही पिकांवर तणनाशकाचा वापर करतात त्यामुळे त्यांना हा तणनाशकाचा वापर करणे महाग पडू शकते, कारण पूर्णतः तणनाशकाची माहिती असल्याशिवाय कोणत्या तणावर कोणते तणनाशक वापरावे याची माहिती केल्याशिवाय त्यांना नाशिक वापरू नये, तसेच तणनाशक फवारणी करताना सुद्धा काही आवश्यक बाबी शेतकऱ्यांच्या लक्षात घेणे गरजेचे आहे, अन्यथा त्यांच्या पिकावर व पिकाच्या उत्पादनावर सुद्धा घट बघायला मिळू शकते.
कापसासारख्या पिकांमध्ये पेंडीमेथैलिन याची फवारणी केली जाते व या व्यतिरिक्त गहू, ज्वारी धान अशा पिकांमध्ये हार्मोनवर्धक असे तन नाशक वापरले जाते. राउंडअप हे तणनाशक सर्व प्रकारच्या तणांचा नाश करण्यासाठी वापरण्यात येते यावरून कळलेलेच असेल कोणत्या पिकांमध्ये कशा प्रकारचे तन नाशक वापरावे, शेतकऱ्यांनी तन नाशक फवारणी करत असताना स्वच्छ पाणी वापरावे तसेच जमिनीमध्ये ओल असेल तरच फवारणी करावी अन्यथा कोरड्या जमिनीमध्ये तणनाशक फवारणीचा कोणताही फायदा होत नाही.
तुम्ही ज्या पिकामध्ये तन नाशक वापरत आहात त्या पीकामांमध्ये जास्तीत जास्त कशा प्रकारचे तन आहे, त्याच प्रकारानुसार त्यांना खरेदी करावी व ते तननाशक मारावे, तणनाशकाची फवारणी केल्यानंतर तो पंप स्वच्छ धुवावा गरम पाणी किंवा इतर निर्मा वगैरे टाकून स्वच्छ धुवावा व त्यानंतरच इतर पिकांवर फवारणी करावी, असे न केल्यास शेतकऱ्यांना मोठा तोटा सुद्धा बघायला मिळू शकतो त्यामुळे वरील प्रमाणे बाबी लक्षात घेऊन काळजीपूर्वक तणनाशकाचा वापर शेतकऱ्यांनी करावा.