मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेच्या माध्यमातून मिळणार महाराष्ट्रभर मोफत प्रवास, लगेच या ठिकाणी अर्ज करा | Tirthadarshan Yojana

महाराष्ट्रामध्ये नवीन योजना म्हणजेच जी योजना तीर्थदर्शन करू इच्छिणाऱ्या वृद्ध नागरिकांसाठी महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून राबवली जात आहे, म्हणजेच मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना होय. या योजनेची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेली असून योजनेच्या माध्यमातून कोणते नागरिक लाभ घेऊ शकणार आहेत? योजनेचे मुख्य उद्दिष्ट व अर्ज प्रक्रिया कोणत्या ठिकाणी व कशा पद्धतीने करायची? याबद्दल संपूर्ण माहिती खालील प्रमाणे जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलताना म्हणाले की या मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेची मागणी आमदार प्रताप सरनाईक यांच्या माध्यमातून केली गेलेली होती, योजनेची घोषणा सुद्धा आता मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे.

 

ज्येष्ठ नागरिकांना तीर्थ दर्शन करायचे असते परंतु त्यांच्याकडे पुरेसा पैसा उपलब्ध नसल्याने त्यांचे तीर्थदर्शन करण्याचे स्वप्न अपुरे राहते, व हीच अडचण ओळखून शासनाच्या माध्यमातून राज्यांमध्ये मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना राबवली गेलेली आहे. या योजनेमध्ये विविध प्रकारच्या धर्मीय तीर्थस्थळांचा समावेश असेल, हिंदू, जैन, ईसाई, शीख, बौद्ध, ख्रिश्चन अशा धर्मियांच्या तीर्थांचा यात समावेश असणार आहे.

 

शासनाच्या माध्यमातून 20 हजार रुपयांचे अनुदान म्हणजेच निधी दिंडीला दिलेला आहे, यामुळेच वृद्धांना एक प्रकारचा दिलासा मिळणार आहे, त्याबरोबरच राज्यातील जवळपास 10 हजार लोकांना तीर्थ दर्शन घडवले जाणार आहे, एवढेच नाही तर शासनाच्या माध्यमातून विधानसभा निवडणुका येत असल्याने मोठ्या प्रमाणात घोषणा केल्या जात आहे त्यामध्ये महिलांसाठी सुद्धा मोठ्या प्रकारच्या घोषणा करण्यात आलेल्या आहेत.

 

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेच्या माध्यमातून लाभ घेण्यासाठी वृद्ध व्यक्तींना सर्वप्रथम अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे, त्याकरिता जिल्हा प्रशासनाच्या कार्यालयात किंवा ऑनलाईन पद्धतीने सुद्धा अर्ज प्रक्रिया उपलब्ध करून दिली जाईल, त्या ठिकाणी वृद्ध असल्याचे प्रमाणपत्र, आधार कार्ड, मोबाईल क्रमांक अशा पद्धतीची कागदपत्रे जोडून अर्ज करावा लागेल, त्यानंतर योग्य प्रकारे वृद्धांची तीर्थ दर्शनासाठी निवड केली जाईल, योजनेचा लाभ दिला जाईल. अशाप्रकारे जवळपास दहा हजार नागरिकांना मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेचा लाभ दिला जाणार आहे.

 

महाडीबीटी च्या माध्यमातून ठिबक व तुषार सिंचनासाठी निवड झालेली असल्यास शेतकऱ्यांनो लगेच ही कागदपत्रे अपलोड करा