आता व्हॉटस् ॲप तसेच कॉल वर करा पिक विमा न मिळणे, अनुदान न मिळणे अश्या विविध बाबींची तक्रार | Trakrar Nivaran WhatsApp Number

शेतकऱ्यांसाठी एक प्रकारे सुलभता यावी त्यांना असलेल्या तक्रारीचे प्रश्नांचे निवारण व्हावे याकरिता कृषी विभागाच्या माध्यमातून तक्रार करण्यासाठी टोल फ्री क्रमांक त्याबरोबरच whatsapp क्रमांक देण्यात आलेला आहे, त्यावरून शेतकरी अगदी सहजरीत्या आपली जी कोणती तक्रार असेल, ती नोंदवू शकणार आहेत, शेतकऱ्यांना शेती करत असताना खरीप हंगाम असो किंवा इतरही हंगाम अशा स्थितीत विविध प्रकारच्या अडचणी भासतात, त्यामुळे अशा अडचणी शेतकऱ्यांच्या लवकरात लवकर सोडवल्या जात आहे, याकरिता टोल फ्री क्रमांक व्हाट्सअप क्रमांक शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिलेला आहे.

 

शेतकऱ्यांची तक्रार केल्यानंतर त्यांची संपूर्ण माहिती एका गुगल फॉर्म मध्ये भरली जाते, त्यानंतर ती भरली गेलेली माहिती पुढे जिल्ह्यामधील संबंधित अधिकाऱ्यांना पाठवली जाते, व त्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या तक्रारीचे निवारण केले जाईल. व कार्यवाही केली जाईल. शेतकऱ्यांनी आतापर्यंत 439 तक्रारी केलेल्या आहे, म्हणजेच टोल फ्री क्रमांका वरून कृषी विभागाकडे या तक्रारी करण्यात आलेल्या आहे व त्यापैकी 221 तक्रारीचे निवारण सुद्धा केले गेलेले आहे, यापुढे अजूनही तक्रारीचे निवारण केले जातील.

 

शेतकऱ्यांना तक्रार करायची असेल तर 1800-233-4000 या टोल फ्री क्रमांका वरून करता येणार आहे. कंट्रोल रूम च्या माध्यमातून या तक्रारी घेतल्या जातील, ही कंट्रोल रूम पुणे या ठिकाणच्या कृषी आयुक्तालयातील निविष्ठा व गुण नियंत्रण अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली कार्यरत असणार आहे. आतापर्यंत 439 तक्रारी आलेल्या असून यामध्ये येणाऱ्या तक्रारीत खत व बियाणे जास्त दरामध्ये विक्री होणे, अनुदान न मिळणे, पिक विमा न मिळणे यासह इतरही तक्रारींचा समावेश आहे.

 

महाडीबीटी च्या माध्यमातून ठिबक व तुषार सिंचनासाठी निवड झालेली असल्यास शेतकऱ्यांनो लगेच ही कागदपत्रे अपलोड करा